नेहरू पुतळा प्रकरणाबाबत बैठकांचे सत्र..कॉंग्रेस शिष्टमंडळाची जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासमवेत चर्चा..सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक


नेहरू पुतळा प्रकरणाबाबत बैठकांचे सत्र..कॉंग्रेस शिष्टमंडळाची जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासमवेत चर्चा..सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

नेहरू पुतळा प्रकरणाबाबत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासमवेत चर्चा केली. 

नगर (प्रतिनिधी संजय सावंत :) लालटाकी येथील नेहरू पुतळ्या भोवती उभारण्यात आलेल्या होर्डींग्सच्या विषयावरून प्रशासनाच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या समवेत अर्धा चर्चा केली.यावेळी काळे यांच्यासह दीप चव्हाण, निजामभाई जहागीरदार, खलील सय्यद, अज्जूभाई शेख, नलिनीताई गायकवाड, नाथा अल्हाट, डॉ. प्रा. बापू चंदनशिवे, कौसर खान, अक्षय कुलट, चिरंजीव गाढवे, सुजित जगताप, अन्वर सय्यद, मुबीन शेख, प्रवीण गीते, प्रमोद अबुज, अमित भांड, अनिसभाई चुडीवाल, शरीफ सय्यद, निताताई बर्वे, वाहिद शेख, प्रशांत जाधव, प्रसाद शिंदे आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसने पंडित नेहरू पुतळ्याची आणि परिसराची झालेली दैनावस्था यावेळी पोलीस अधीक्षक पाटील यांच्यासमोर मांडली. होर्डिंग्जमुळे निर्माण झालेला आडोसा यासाठी कारणीभूत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशाच प्रकारची भूमिका काँग्रेस पक्षाची असून पोलीस यंत्रणेवर कोणताही ताण येऊ नये यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने सामंजस्याची भूमिका घेऊन होर्डिंग्ज काढत झालेली अक्षम्य चूक तातडीने दुरुस्त व्हावी अशी भूमिका यावेळी काँग्रेसने मांडली. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी काँग्रेस शिष्टमंडळाचे म्हणणे समजून घेत या विषयावरती सखोल चर्चा केली. प्रशासन योग्य ती पावले निश्चितपणे उचलेले असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

काँग्रेसच्या भूमिके नंतर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत प्राथमिक चर्चा केली आहे. सोमवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, मनपाचे उपायुक्त पैठणकर, कर विभागाचे उपायुक्त संतोष लांडगे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, उद्यान विभाग, विद्युत विभाग आणि संबंधित अधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये या विषयासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे शहराचे लक्ष लागले आहे. 


जाहिरात
Search
विडिओ
Recent News