... नाही तर होऊ शकते एक फेब्रुवारीपासून तुमचे रेशन बंद!


... नाही तर होऊ शकते एक फेब्रुवारीपासून तुमचे रेशन बंद!

न्यूज नेटवर्क

रेशन कार्ड किंवा रेशन धारकांची संख्या भारतामध्ये भरपूर आहे. अत्यावश्यक गरजांमध्ये रेशन येते. मात्र काही गोष्टींची पूर्तता तुम्ही 1 तारखेपर्यंत म्हणजेच 1 फेब्रुवारीपर्यंत केली नाही, तर तुमचे रेशन होऊ शकते बंद! केंद्र शासनाच्या आदेशानुसार, ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे आणि जे रेशन कार्ड वर मिळणाऱ्या धान्याचा लाभ घेतात, त्यांना 1 फेब्रुवारी पर्यंत आपल्या रेशन कार्ड ला आधार क्रमांक लिंक करावा लागणार आहे.

आतापर्यंत 10 लाख 61 हजार 822 लाभार्थ्यांनी आधार कार्ड लिंक करून घेतले आहे. रेशन कार्ड धारकांनी रेशन दुकानावर जाऊन आधार कार्ड सोबत घेऊन ते लिंक करून घ्यावे. 

का होत आहे आधार लिंक करण्याची प्रक्रिया?*

स्वस्त धान्याचा लाभ फक्त गरजू व्यक्तींना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बोगस रेशन धारक यातून पुढे येतील आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आणखी पारदर्शकता वाढेल. म्हणून, हि मोहीम सुरू करण्यात आली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News