अज्ञात वाहानाच्या धडकेत दोन ठार( काष्टीत नगर-दौंड रोडवर अपघात)


अज्ञात वाहानाच्या धडकेत दोन ठार( काष्टीत नगर-दौंड रोडवर अपघात)

श्रीगोंदा प्रतिनिधी अंकुश तुपे
श्रीगोंदा तालुक्यातील नगर-दौड रोडवर काष्टी येथे अज्ञात वाहानाच्या धडकेत अजय वाळूंज( वय २२) राहणार टाकळी कडेवळी ता.श्रीगोंदा जि.अ.नगर  व पवन योगेश खरात (वय१२) राहणार काष्टी  (खरातवाडी) ता.श्रीगोंदा  जि.अ.नगर हे दोघे अज्ञात वाहनाच्या धडकेत मयत झाले असुन पुढील तपास पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांच्या   मार्गदर्शनाखाली सुरु आहे. 
             सविस्तर माहिती अशी कि दि.८ रोजी रात्री ९ ते १० च्या सुमारास  तालुक्यातील नगर-दौड या महामार्गावर काष्टी येथील हाॕटेल शिवनेरी जवळ अजय वाळूंज व पवन खरात हे दोघे श्रीगोंदा येथून कपडे खरेदी करुण काष्टीच्या दिशेने आपल्या बुलेट गाडीवर   येत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिल्याने सिमेंट काॕक्रेटच्या रस्त्यावर दोघेही पडले अपघाता नंतर धडक देणारे वाहन पळून गेले.घटने नंतर बाजार समितीचे मा.उपसभापती वैभव पाचपुते, बंडू जगताप,जयवंत बोत्रे,सुरज राहिंज,प्रशांत भोर,अल्ताफ शेख,अनिल कानडे यांच्यासह तरुण मदतीला धावले पण यामध्ये पवन खरात जागेवर मयत झाला होता तर अजय वाळूंज हा गंभीर जखमी झाल्याने त्यांला ताबडतोब मदत करणाऱ्या तरुणांनी उपचारासाठी दौंड येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली सदर दोन्ही मयत व्यक्ती कोण आहे. माहिती मिळेना मयताच्या अंगातील शर्ट मध्ये श्रीगोंदा येथे कपडे खरेदी केल्याची पावती होती त्यावर नाव असल्याने  मयताच्या कुटुंबातील सदस्य यांच्या पर्यत संपर्क करण्यात आला दोन्ही मयत तरुण व्यक्ती हे आईवडील यांना एकुलते एक होते. दि.९ रोजी सकाळी शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.पुढील तपास श्रीगोंदा पोलिस  करीत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News