हृदयद्रावक! भंडारा रुग्णालयातील शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू!


हृदयद्रावक! भंडारा रुग्णालयातील शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू!

न्यूज नेटवर्क

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये शिशु केअर युनिट ला मध्यरात्री लागलेल्या आगीत गुदमरून 10 नवजात  अर्भकांचा मृत्यू झाला आहे. हि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्यानंतर पूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शंका व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ चौकशीचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी बोलून त्यांनी तपासण्याचेदेखील निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालय कडून देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्र्यांकडून नातेवाईकांना मदतीची घोषणा!

रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये मृत्यू पावलेल्या बालकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.आज संध्याकाळी पाच वाजता आरोग्यमंत्री स्वतः भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता भाजपकडून कडून करण्यात येत आहे.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News