दौंड रेल्वे उड्डाण पुलावर दोन महिन्यांपासून एकेरी वाहतूक, ठेकेदारांना अभय कोणाचे ?नागरिकांचा प्रश्न


दौंड रेल्वे उड्डाण पुलावर दोन महिन्यांपासून एकेरी वाहतूक, ठेकेदारांना अभय कोणाचे ?नागरिकांचा प्रश्न

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

- दौंड शहरातील अंतर्गत रस्ते व मनमाड वरून आलेला बाह्य रस्ता यामुळे शहरातील व्यवसाय व अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे, त्याचा फटका व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेला बसत आहे,परंतू गेंड्याची कातडी पांघरलेल्या ठेकेदारांना अभय कोणाचे मिळत आहे, यांच्या अर्धवट कामांमुळे जनता त्रस्त झाली आहे, या रस्त्यावरून कितीतरी वेळा आंदोलन झाले,अंतर्गत रस्त्यासाठी नगरपालिका गटनेते राजेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्यात बसून आंदोलन केले होते, आताही या बाह्यवळण रस्ता अरुंद होत असल्याने गायकवाड यांनी ठेकेदारांच्या मनमानी विरोधात आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे,मागच्या आठवड्यात नगरसेवक जिवराज पवार,फिरोज तांबोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा आंदोलन केले आहे, परंतू ठेकेदारांना काहीच फरक पडला नाही, दौंड मुख्य रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल गेल्या दोन महिन्यांपासून एक बाजू खोदून रस्ता बंद करून ठेवला आहे,तेव्हा पासून एकेरी वाहतूक सुरु आहे, आणि ज्या बाजूने वाहतूक सुरू आहे त्याबाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे,दोन वर्षांपासून दौंड शहरात रस्त्याबाबत ठेकेदार यांच्या मनमानी कारभारा मुळे व्यापारी आणि जनता दोन्ही वैतागले आहेत,एवढी आंदोलने झाली शहरातील व्यापार ठप्प झाला तरीही रस्ते आणि ठेकेदार जैसे थे, त्यामुळे जनतेतूनच प्रश्न निर्माण झाला आहे की या ठेकेदारांना शासनाच्या नियमाप्रमाणे रस्ते व्यवस्थित आणि वेळेत करण्यास काय अडचण येत आहे, नक्की घोडं कुठे अडले,यांच्या मनमानी कारभाराला कोण अभय देतंय  अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News