रिपाइं जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांची भिम गायिका कडूबाई खरात यांना अनोखी भेट!


रिपाइं जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांची भिम गायिका कडूबाई खरात यांना अनोखी भेट!

राहुरी फॅक्टरी, महाराष्ट्रभुमी प्रतिनिधी

भिम गायिका कडूबाई खरात हे नाव आज राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचले ते महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गितामुळे. कडूबाईंनी गायनाला सुरुवात केली की, कधी अंगावर शहारे येतात, कधी पापण्या अलगद ओल्या होतात तर कधी मन प्रफुल्लित होते. भिम गितं गाणाऱ्या कडूबाई खरात यांना रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) चे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी नुकतीच एक अप्रतिम भेट दिली. 


कडूबाई खरात या भिम गायिकेसाठी रिपाइं जिल्हाध्यक्ष श्री. थोरात यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हातात संविधान असलेला पूर्णाकृती पुतळा भेट दिला आहे. या अनोख्या भेटीमुळे कडूबाई खरात देखील भारावल्या, डोळ्यात आनंदाश्रू तरळले.


याबाबत अधिक माहिती घेतली असता श्री. थोरात यांनी सांगितले की, कडूबाई खरात औरंगाबाद मध्ये बौध्द विहार बांधत आहेत. त्याकामी देणगी मिळवण्यासाठी त्या फिरत आहेत. माझ्याकडे त्या आल्या आणि आम्हाला असाच पुतळा पाहिजे, असे बोलल्या. श्री. थोरात यांनी सांगितले की, मी भिम गितांचा चाहता आहे. लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या नंतर निःस्वार्थ बाबासाहेबांचे चरित्र मांडण्याचे काम कडूबाई थोरात करत आहेत. त्यांना बौध्द विहारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा पाहिजे होता, त्यांच्या एवढ्या मोठ्या कार्यास मी छोटासा हातभार लावला, अशी प्रतिक्रिया श्री. थोरात यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News