श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात पत्रकारांच्या उपस्थितीत पत्रकार दिन उत्साहाने साजरा !!


श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात पत्रकारांच्या उपस्थितीत पत्रकार दिन उत्साहाने साजरा !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात ६ जानेवारी रोजी पत्रकार दिना निमित्त शहरातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे हे  होते.या कार्यक्रमात पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष नानासाहेब जवरे यांचे हस्ते गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्यांस पुष्पहार घालण्यात  आला.

           प्रारंभी उपस्थितांचे स्वागत रवि पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.कोपरगांव एज्युकेशन सोसायटी सचिव दीलीप अजमेरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला सहसचिव सचिन अजमेरे,दै.सकाळ वृत्तसमुहाचे मनोज जोशी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे मनीष जाधव,दै.लोकमतचे रोहीत टेके, विजय कापसे,शंकर दुपारगुडे, अक्षय काळे, रविंद्र जगताप,अमोल गायकवाड, हाफीज शेख,स्वप्नील कोपरे, जनार्धन जगताप, फकिराव टेके, अनिल दीक्षित,सिध्दार्थ मेहेरखांब, संजय भारती,बिपिन गायकवाड, संजय लाड, योगेश डोखे,सोमनाथ सोनपसारे आदी मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.या सर्व पत्रकारांचा विदयालयाच्या वतीने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.डी.गोरे यांनी तर आभार विदयालयाचे जेष्ठ शिक्षक रमेश  गायकवाड  यांनी मानले. या कार्यक्रमाला तूपसैंदर डी.व्ही,आव्हाड व्ही.एम,जाधव ई.एल,कुळधरण बी.बी,निलेश बडजाते,अनिल काले,बलभिम उल्हारे,योगेश गवळे,सौ.पुरी एस.व्ही,बोरावके आर.आर,महानुभाव के.एच आदि शिक्षक उपस्थित होते..

जाहिरात
Search
विडिओ
Recent News