मतदान केंद्रावरील नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न !!


मतदान केंद्रावरील नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

निवडणुक केंद्रावरील कामकाज हाताळतांना प्रशिक्षणाचा सदुपयोग करा.तहसिलदार योगेश चंद्रे  !!

कोपरगाव - तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रत्यक्ष कामकाज पहातांना ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया समजून घेवून प्रशिक्षणातील शिक्षण प्रत्यक्ष निवडणूक केंद्रावर सदुपयोग करावे.असे राज्य निवडणूक आयोग नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.

कोपरगाव तालुक्यात २९ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून आज कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणूकीत मतदान केंद्रावर कामकाज पहाणारे केंद्राध्यक्ष, सहाय्यक कर्मचारी असे ६६० लोकांना अंतिम प्रशिक्षण संत जनार्दन स्वामी आश्रम भक्त निवास १ येथे देण्यात आले.निवडणुक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी भेट देवून पहाणी केली.

या प्रशिक्षणात प्रत्यक्ष मतदान केंद्रावर आदर्श आचारसंहिता नियमांचे पालन,कोरोना संसर्ग काळात घ्यावयाची काळजी यावर चलचित्र फितीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.या निमित्त प्रत्यक्ष मतदान केंद्रावर कामकाज पहाणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना मतदान यंत्राची प्रत्यक्ष हाताळणी प्रशिक्षण देण्यात आले.

२९ ग्रामपंचायत निवडणूकीत एकुण मतदान केंद्र ११२ असून २७२ जागेसाठी ६११ उमेदवार रिंगणात आहेत.६३७८५ मतदार पुरुष ३२८९६ स्रीया ३०८८९ मतदार आहेत.

शुक्रवार १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७:३० ते दुपारी ५:३० पर्यत मतदान असणार आहे. या प्रशिक्षणाला विभागीय अधिकारी, केंद्राध्यक्ष, केंद्र स्तरावरील कर्मचारी उपस्थित होते.निवडणूक प्रक्रिया यशस्वीतेसाठी निवडणूक नायब तहसिलदार प्रशांत गोसावी,माधवी गोरे .मनिषा कुलकर्णी,अरुण रणनवरे, यांचे सह विविध खातेनिहाय अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News