भ्रष्टाचार व अनागोंदी थांबवून सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनची तमसतंत्र निब्बानची घोषणा


भ्रष्टाचार व अनागोंदी थांबवून सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी  पीपल्स हेल्पलाईनची तमसतंत्र निब्बानची घोषणा

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार व अनागोंदी थांबवून सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने तमसतंत्र निब्बानची घोषणा करण्यात आली आहे. या तंत्राने उन्नतचेतनेचा प्रचार व प्रसार करुन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

 स्वातंत्र्यानंतरचे 73 वर्ष उलटून देखील भारतात सर्वसामान्य व्यक्ती दु:खी आहे. सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचार व अनागोंदी वाढल्याने त्यांना जीवन जगणे कठिण झाले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. मात्र शिक्षणाने वरच्या स्तरावर गेलेल्या लोकांनी सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. तर स्वत:चे हित साधल्याने समाजात भ्रष्टाचार व अनागोंदी पसरली आहे. माणसामध्ये तमसचेतना फोफावत असताना शेतकरी, अल्पसंख्यांक, घरकुल वंचित व बेरोजगार या अनागोंदीचे बळी ठरत आहे. परिणामी समाजात दारिद्रय गरिब-श्रीमंताची दरी पसरत आहे. यासाठी तमसतंत्र निब्बान हा एकमेव पर्याय असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्तीवर आई-वडील व समाजाकडून संस्कार घडत असतात. ज्या व्यक्तीत स्वार्थ, अप्पलपोटेपणा व कष्ट न करता दुसर्‍याचे मिळवण्याचा प्रयत्न सुरु असतो त्यामुळे तमसचेतना वाढत जाते. राज्यकर्ते मंडळी जात, पैशाचा वापर करून मागच्या दाराने सत्तेत येऊन समाजाची लूट करतात. हे लूट करणारे लोक आनंदी राहत नाही. तर त्यांचा लोभ देखील कमी होत नाही. धर्मांध व तमसचेतनेच्या आहारी गेलेले व्यक्ती दुसर्‍यांना दु:ख देण्याचे कार्य करतात व स्वत: देखील सुख हिरावून बसतात. धर्माच्या शिकवणीचा चुकीचा अर्थ काढून स्वत:चे हित पाहतात. मनुष्याचे जीवन भौतिक व मानसिक दृष्ट्या सुखी होण्याची गरज असून, ते तमसतंत्र निब्बानाने साध्य होणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News