अंकुश शिंदे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी फेर निवड.


अंकुश शिंदे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी फेर निवड.

श्रीगोंदा प्रतिनिधी (अंकुश तुपे):- मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य  बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची  श्रीगोंदा येथे  कुकडी शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली.यामध्ये श्रीगोंदा तालुकाध्यक्ष पदी अंकुश शिंदे यांची सर्वानुमते फेर  निवड करण्यात आली.

    श्रीगोंदा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकरयांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाध्ये जेष्ठ पत्रकार डॉ. प्रा. बाळासाहेब बळे व जेष्ठ पत्रकार सुनील कारंजकर यांचा सत्कार करून तालुक्यातील सर्व पत्रकारांचा मिठाई वाटून सन्मान करण्यात आला.तसेच दरवर्षी प्रमाणे ६ जानेवारी ला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी अध्यक्ष पदाची निवड केली जाते. त्याअनुषंगाने सन २०२० मध्ये अंकुश शिंदे यांनी तालुक्यातील पत्रकारांसाठी पत्रकार भवन उभारण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांच्या कडे मागणी करून पाचपुते यांनी २०लाख रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच कोरोना काळात सर्व पत्रकार व वितरक यांना मास्क, सॅनिटायझर,किराणा किट वाटप करून आधार देण्याचे काम केले या कामाची दखल घेऊन संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते यांनी फेरनिवड करून अंकुश शिंदे यांना तालुकाध्यक्ष पदाची परत एकदा संधी देण्यात आली.

    यावेळी पत्रकार शिवाजी साळुंखे, सुभाष शिंदे, दादा सोनवणे, उत्तम राऊत,शकील भाई शेख,पीटर रानसिंग,योगेश चंदन,अनिल तुपे, अंकुश तुपे,रामदास कोळपे, विजय उंडे, पंकज गणवीर, दीपक वाघमारे, राजु शेख, सोहेल शेख, चंदन घोडके, प्रमोद आहेर, मुस्ताक पठाण, विजय मांडे आदी पत्रकार उपस्थित होते.

    शिंदे यांची निवड होताच माजी आमदार राहूल जगताप, साई उदयोग समूहाचे सदाशिव पाचपुते, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, काष्टी सेवा संस्थेचे मार्गदर्शक भगवानराव पाचपुते,श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गट नेते मनोहर पोटे, उपनगराध्यक्ष रमेश लाढणे, शहाजी खेतमाळीस, संतोष खेतमाळीस,सतीश मखरे, वृद्धेश्वर बँकेचे चेअरमन भाऊसाहेब वाडगे, स्वामिनी पतसंस्थेचे चेअरमन प्रतिभा गांधी तसेच  तसशीलदार प्रदीपकुमार पवार, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, व पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News