पोहेगाव येथे शासकिय आधार नोदणी व दुरुस्ती केंद्राचा शुभारंभ !!


पोहेगाव येथे शासकिय आधार नोदणी व दुरुस्ती केंद्राचा शुभारंभ !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

दि.७ जानेवारी रोजी पोहेगाव येथे सतिश कदम संचालित शासकिय आधार नोंदणी व दुरूस्ती केंद्राचे उद्धाटन कैलासनंदगीरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर आधार नोंदणी व दुरूस्ती केंद्र हे मा.जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत नोंदणीकृत असुन या केंद्रात आधारकार्ड नोंदणी व मोबाइल नंबर लिंक करणे, बायोमॅट्रिक अपडेट,जन्म तारीख तसेच नाव व पत्ता दुरुस्ती,या सह आधार संबंधीत सर्व कामे केली जाणार असल्याची माहीती केंद्र चालक सतिश कदम यांनी दिली आहे.

शासन दरबारी तसेच बँकेत कुठलेही काम होणेसाठी आधार कार्ड गरजेचे असल्याने ते काढण्यासाठी या अगोदर नागरीकांचा वेळ,पैसा खर्च होउन सुद्धा काम वेळेवर न झाल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत असे या अगोदर कुंभारी व रवंदे येथे व आता पोहेगाव येथे नविन शाखा सुरू झाल्याने गावातच आधार नोंदणी व दुरूस्तीची कामे होणार असल्याने नागरीकांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

या कार्यक्रमास जि.प.सदस्य राहुल रोहमारे जिनिंग प्रेस सोसा. चे माजी चेअरमन निवृत्ती शिंदे मंडलाधिकारी जेडगुले सरपंच अमोल औताडे,उपसरपंच प्रशांत रोहमारे सदस्य नंदकिशोर औताडे, पोलीस पाटील जयंत रोहमारे, देवेंद्र रोहमारे, राजुभाउ औताडे, वाल्मिक नवले, नितीन शिंदे. प्रमोद औताडे. भाउसाहेब निवृत्ती औताडे, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News