महात्मा फुले व इतर महापुरुषांचे साहित्य वाचले तर मनुष्य चांगल्या मार्गानेच जाणार म्हणूनच आपला महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकराचा आहे असे म्हंटले जाते- स.पो.निरीक्षक राजकुमार भुजबळ


महात्मा फुले व इतर महापुरुषांचे साहित्य वाचले तर मनुष्य चांगल्या मार्गानेच जाणार म्हणूनच आपला महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकराचा आहे असे म्हंटले जाते- स.पो.निरीक्षक राजकुमार भुजबळ

पोलीस पाटील ,पत्रकार,नगरपरिषद कर्मचारी यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार सम्पन्न

रघुनाथ ढोक पुणे प्रतिनिधी:

दहिवडी -फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन व राष्ट्रीय ओबीसी महासंघा तर्फे महिला शिक्षण दिन व पत्रकार दीनानिमित्त दहिवडी हद्दीतील 49 पोलीस पाटील आणि 17 पत्रकार,8 नगरपरिषद कर्मचारी,3 पोलीस अधिकारी आणि 2 शिक्षक  असे एकूण 85 बंधु भगिनीचा आपल्या परिसरात कोरोना महामारीच्या काळात जीवाची काळजी न करीता  जनसेवेसाठी मौलिक योगदान दिले त्याबद्दल *कोरोना योध्दा* म्हणून दि. 7.जाने.2021 रोजी दुपारी 4 वाजता दहिवडी पोलीस परेड ग्राउंड वर  मान्यवरांचे हस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले फोटो फ्रेम ,ज्ञानज्योती फुले ग्रंथ, सन्मान पत्र देऊन सन्मानित केले.

                  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. राजकुमार भुजबळ तर प्रमुख पाहुणे म्हणून पो.उपनिरीक्षक देवानंद तुपे,माण पत्रकार संघाचे अध्यक्ष रुपेश कदम, चैतन्य संस्थेचे संदीप खाडे,जेष्ठ समाजसेक भगवानराव गोरे आणि सत्यशोधक रघुनाथ ढोक, सुदाम धाडगे उपस्थित होते.

यावेळी राजकुमार भुजबळ यांचा पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी संभाळत असताना गेली अनेक वर्षे वेळोवेळी जनसामान्यांत  जावून सामाजिक प्रबोधन करीत आहेत त्याबद्दल  आयोजक अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते महात्मा फुले पगडी, उपरण ,सन्मानपत्र देऊन  सन्मानित केले.

याप्रसंगी भुजबळ साहेब म्हणाले की आज माझा वाढदिवस आणि असा बहुमान होत आहे हे माझे भाग्य  आहे याचे कारण म्हणजे शालेय  जीवनापासून महात्मा फुले व इतर महापुरुषांचे साहित्य वाचत आलो त्यामुळे कृतिशील सामाजिक कार्य करण्याची आवड निर्माण झाली. आपण सर्वांनी ते अवलंबून करा याचा परिणाम नक्कीच चांगला दिसेल .यामुळे तर आपला महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकररांच्या  विचाराचा ,कार्याचा  आहे असे  वारंवार म्हंटले जाते.पुढे असेही म्हणाले की पोलीस मंडळी पेक्षा पोलीस पाटील ,पत्रकार अल्प मानधनात तसेच खास करून कोव्हीड मधील मयत व्यक्तींना मोक्ष देण्याचे महान कार्य नगरपरिषद कर्मचारी यांनी केले या सर्वांचा पुण्यावरून येऊन ढोक सरांनी त्यांचे संस्थेचे वतीने सन्मानपूर्वक यथोचित गौरव केला असाच सन्मान 20 वर्षपूर्वी  त्यावेळचे व आजचे  राजस्थान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे हस्ते महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यावर निबंध लिहिला आणि दुसरा नंबर आला म्हणून समता भूमीवर सत्कार केला तसेच आजचा फुले पगडी ने सन्मान  त्यामुळे आम्हा सर्वांची जबाबदारी वाढली आहे. कोरोना अजूनही संपला नसल्याचे सांगून जागरूकतेने काम करू या आणि आता निर्बन्ध शिथिल झाल्याने जास्त काळजी घेणे जरुरीचे आहे असे देखील म्हंटले.

या प्रसंगी रघुनाथ ढोक म्हणाले की 18 व्या शतकात मुली महिलांना शिक्षण घेणे अवघड होते तसेच आज ही ग्रामीण भागातील मुलींना पदवी व इतर शिक्षण घेण्यासाठी दहिवडीला ,शहरात  यावे  लागते त्यामुळे त्यांची सुरक्षितता पहाणे आपल्या सर्वांचे काम आहे. नवीन पिढीला महापुरुषांचे विचार कार्य सांगण्याची देखील नितांत गरज आहे,तसेच अंधश्रद्धा कर्मकांड यातून बाहेर काडून सत्यशोधक विचार सांगून  उच्च ध्येय गाठण्याची ईर्ष्या निर्माण करणे जरुरीचे आहे. याच पद्धतीने संदीप खाडे, रुपेश कदम यांनी मार्मिक विचार मांडून महापुरुषांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणावेत असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील आप्पासाहेब गायकवाड ,तर आभार प्रदर्शनात सुदाम धाडगे यांनी सत्यशोधक विवाह राज्यात परराज्यात आमचे संस्थेने  मागील अडीच वर्षात  एकूण 22 लावल्याचे व 23 वा आटपाडी परिसरात देखील पहिला सत्यशोधक विवाह  2 फेब्रुवारी 21 ला असल्याचे सांगितले.

यावेळी मान्यवरांचे शुभहस्ते छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले , सावित्रीबाई फुले ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून बळीराजा,व महापुरुषांचे फोटोचे तसेच राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान ,महात्मा फुले समग्र वाड्मय प्रथम आवृत्ती चे पूजन केले तर मोलाचे सहकार्य आकाश ढोक,पो पाटील राजेंद्र मगर, लाखन बोराटे, संजीवनी ब्लड बँक व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे नम्र आव्हानास स्वीकारून रक्तदाते यांनी श्रेष्ठ दान - रक्तदान कृतीने केले ते सर्वजण तसेच मोहन सुतार , तरुण पत्रकार आकाश  दडस ,दहिवडी पोलीस स्टेशन चे कर्मचारी,होमगार्ड यांनी देखील मोलाची मदत केली यावेळी राजकुमार भुजबळ यांनी आपला वाढदिवस स्वतः  रक्तदान करून केला तर त्यांचा अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांनी जाहीर सत्कार केला तर महिला सत्कारमूर्तींनी   सावित्रीबाई चे आडवे कुंकू लिहून आम्ही सावित्री च्या लेखी मागे नाहीत याचे अनमोल दर्शन दिले त्यामुळे कार्यक्रमाला रंगत आली होती.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News