कोरोना संकटकाळातील पत्रकारांची मदत मोलाची !! - तहसिलदार योगेश चंद्रे


कोरोना संकटकाळातील पत्रकारांची मदत मोलाची !!  - तहसिलदार योगेश चंद्रे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

      कोरोना महामारीच्या संकटकाळात पत्रकारांची मोलाची मदत झाल्याची प्रतिपादन तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे यांनी व्यक्त केले.

 दि.७ जानेवारी कोपरगाव येथील तहसिलदार कार्यालयात कोरोना नियंत्रण समितीच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

या निमित्ताने कोरोना संसर्ग निर्मुलन अभियानात पत्रकारांनी दिलेल्या योगदानाबदल विशेष प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे बोलत होते.

याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर,विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे (आव्हाड), पत्रकार नानासाहेब जवरे, डॉ.अरुण गव्हाणे,राजेंद्र सालकर,मनिष जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

दरम्यान दिवंगत पत्रकार अशोक खांबेकर,पांडुरंग रायकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कोपरगाव तहसिल कार्यालयाने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा विशेष गौरवा केला त्याबद्दल पत्रकारांनी समाधान व्यक्त केले

या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी प्रास्तविक यांनी तर सुत्रसंचलन समन्वयक सुशांत घोडके यांनी केले.तर आभार विजय कापसे यांनी मानले.

कार्यक्रमास कोपरगाव प्रेस क्लब, कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, कोपरगाव तालुका तसेच विविध वृत्तपत्रे यांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News