पत्रकार बांधवांकडून पत्रकार दिनानिमित्त बाळकृष्ण जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात साजरी दौंड नगरपालिका येथे अधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्याकडून पत्रकार दिनानिमित्त एक झाड देऊन पत्रकार यांना सन्मानित करण्यात आले


पत्रकार बांधवांकडून पत्रकार दिनानिमित्त बाळकृष्ण जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात साजरी      दौंड नगरपालिका येथे अधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्याकडून  पत्रकार दिनानिमित्त एक झाड देऊन पत्रकार यांना सन्मानित करण्यात आले

सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी

समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी इ.स. १८३२ रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्या दिवसाची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात "मराठी पत्रकार दिन" म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश राज्यकर्त्यांना कळावे म्हणून त्याकाळी दर्पणचा एक स्तंभ मराठीत व एक स्तंभ इंग्रजीत असे.

या वृत्तपत्राने समता आणि व्यक्तिस्वातंत्र्य या तत्त्वांवर समाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न केला. वृत्तपत्रातील मजकूर अर्धा इंग्रजी आणि अर्धा मराठी असे. सुरुवातीला हे पाक्षिक होते. भारतीयांना "देश-काळ-परिस्थिती" चे आणि "परदेशी राजव्यवहारा" चे ज्ञान मिळवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी हे वृत्तपत्र सुरू केले. हे वृत्तपत्र सुरू करताना जांभेकरांनी वृत्तपत्र सुरू करणे मागचा उद्देश स्पष्ट करताना लिहिले होते की लोकांचे प्रबोधन करणे आणि मनोरंजन करणे या उद्देशाने दर्पण हे वृत्तपत्र सुरू करत आहोत

१९९७-९८साली मराठीत एकूण १५६१ वृत्तपत्रे असल्याचे वाचण्यात आले आहे. यांत २२५ दैनिके आहेत. दर्पण वृत्तपत्राने मराठी वृत्तसृष्टीत नवे पर्व सुरू केले , बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या "दर्पण" मध्ये समता आणि व्यक्ती स्वातंत्र्य तत्वावर समाजाची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न केला ,जांभेकरांनी या पत्रातून नवीन पर्व निर्माण केला हे पत्र साडेआठ वर्ष चालले,२६ जानेवारी १८४० रोजी दर्पणचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला.पहिल्या वर्ष अखेरीस 300 वर्गणीदार होते.

दि.६ /१/२०२० रोजी दौंड येथे हरिभाऊ क्षीरसागर यांच्या कॉम्पुटर हॉल मध्ये  पत्रकार दिनानिमित्त बाळकृष्ण जांभेकर यांच्या प्रतिमेचे श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून पत्रकार बांधवांकडून जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी अहिल्या टाइम्स चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सोनवलकर, अग्निसंकेत संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ क्षीरसागर,हिंदुसम्राटचे  पत्रकार दिनेश पवार, शिवाजी टाईम्स चे कैलास जोगदंड पत्रकार पवन साळवे, वरिष्ठ पत्रकार विठ्ठलराव, विजय जाधव, जनप्रवास चे पत्रकार सुरेश बागल आणि संकेत क्षीरसागर उपस्थित होते.त्यानंतर नगरपालिका कार्यालय येथे पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांना विनम्र अभिवादन करून सर्व पत्रकार बांधवांना नगरपालिका अधिकारी आणि नगराध्यक्षा यांच्याकडून एक झाड देऊन सन्मानित करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News