वाकीत पत्रकार दिन साजरा


वाकीत पत्रकार दिन साजरा

काशिनाथ पिंगळे बारामती : प्रतिनिधी 

बारामती तालुक्यातील वाकी याठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने पत्रकारदिन साजरा करण्यात आला. 

       ६ जानेवारी हा दिवस सर्वत्र राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. ६ जानेवारी हा दिन बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. बाळशास्त्री जांभेकर हे मराठी पत्रकारितेचे जनक म्हणूनही ओळखले जातात. त्यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी महाराष्ट्रातील कोकण भागातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथे झाला. मराठी भाषेमध्ये पत्रकारिता सुरू करण्याच्या प्रयत्नांसाठी त्यांची ओळख आहे. दर्पण नावाच्या मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित करण्यात आले.             

      अशा या सहा जानेवारी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या दिवशी वाकी गावात ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार दिन साजरा करून उपस्थित पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

  पत्रकार म्हणून या भागात सर्वांचे उल्लेखनीय व चांगले काम असल्याचे यावेळी गाडे यांनी बोलून दाखवले.

   याप्रसंगी भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुकाध्यक्ष काशिनाथ पिंगळे, संजय कुंभार, विकास यादव, वाकी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पत्रकार यांच्या वतीने नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप गाडे यांनी केले तर आभार हनुमंत जगताप यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News