पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवणारे, सेनेचा वाघ सुरेश फुगे यांचे निधन


पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवणारे, सेनेचा वाघ सुरेश फुगे यांचे निधन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी

पिंपरी (दि. 7 जानेवारी 2021) भोसरी गावचे रहिवाशी सुरेश महादू फुगे (वय 62 वर्षे) यांचे मंगळवारी (दि. 5 जानेवारी 2021) निधन झाले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेनेचे मुहूर्तमेढ सुरेश फुगे यांनी रोवली. भोसरी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात त्यांचे योगदान होते. नरवीर तानाजी तरुण मित्र मंडळाच्या स्थापनेत त्यांचे योगदान होते. मनसेचे माजी शहराध्यक्ष प्रा. सतिश फुगे आणि मनपाचे माजी प्रशासन अधिकारी नारायण फुगे यांचे ते बंधू होत. भाजपाचे नेते विजय फुगे यांचे चुलत बंधू आणि माजी नगरसेविका सुनंदा फुगे यांचे ते चुलतदीर होत. उद्योजक चेतन फुगे आणि सुशिल फुगे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक विवाहीत मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News