३ नंबर गेट उघडण्यासाठी ग्रामस्थांची कार्यकारी अधिकारी बगाटे, यांच्याकडे मागणी


३ नंबर गेट उघडण्यासाठी ग्रामस्थांची कार्यकारी अधिकारी बगाटे, यांच्याकडे मागणी

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

शासनाच्या नियमाने साई बाबा मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात आले आहे,ग्रामस्थ दर्शन आणि गेट नंबर 3 संदर्भात शिष्टमंडळाने  कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे  यांची नुकतीच भेट घेतली असून, या बाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले आहे

  शिर्डी ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांच्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची माजी विश्वस्त डॉ एकनाथ गोंदकर, शिवसेना नेते कमलाकर कोते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते यांनी भेट घेऊन चर्चा केली..

प्रामुख्याने शिर्डी ग्रामस्थांसाठी मंदिर परिसरातील शनी मंदिर, गणपती मंदिर व महादेव मंदिर यांचे सह ग्रामदैवत साईबाबांचे दर्शन सुलभ व खुले होण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली..त्याशिवाय साईभक्तांना दर्शन झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी गेट नंबर 3 खुले करून द्यावे अशी मागणी देखील करण्यात आली..

साई कॉम्प्लेक्स तसेच इतर दुकानदारांचा व्यावसायिक दृष्टिकोन लक्षात घेऊन मारुती मंदिरामागील साई कॉम्प्लेक्समध्ये मोफत दर्शन पासची व्यवस्था सुरू करण्यात यावी जेणेकरून या परिसरामध्ये साईभक्तांचा वावर मोठय़ा प्रमाणात होऊन याचा फायदा दुकानदारांना होईल..याबाबत कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करून गेट नंबर 3 समोरील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये मोफत दर्शन पास काऊंटर सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले…

द्वारकामाई समोरील परिसरातील लोखंडी जाळ्या कढण्यासंदर्भात देखील विनंती शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली..

मंदिराच्या पूर्वेकडील भागात 80 टक्के गाव असल्यामुळे भक्तांना गेट नंबर 5 ने बाहेर काढणे गैरसोईचे असल्याकारणाने गेट नंबर 3 मधून भक्तांना बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली..त्यास कार्यकारी अधिकारी बगाटे साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News