त्रिमूर्तींचा सत्कार आणि पत्रकार दिन


त्रिमूर्तींचा सत्कार आणि पत्रकार दिन

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) नगर शहर काॅंग्रेस उपाध्यक्ष शशिकांत पवार यांची ६१ वी आणि शहापूर-केकती (ता.नगर) ग्रा.पं सदस्यपदी बिनविरोध ठरलेल्या सौ.किरण आळकुटेसह पत्रकार दिनाचे औचित्यसाधून पत्रकार राजेश सटाणकर अशा तिघांचा सत्कार शहर काॅंग्रेसच्या तांगेगल्लीतील कार्यालयात करण्यात आला.

"राजकारणातून समाजकारण करण्याचाआपण प्रयत्न करतो"असे श्री.पवार यांनी यावेळी सांगितले तर ग्रामविकासाला महत्व देण्याचे वचन सौ.आळकुटे यांनी दिले. समाजसुधारणेच्या योगदानात पत्रकारांचाही सहभाग असून पत्रकारितेतील बदल  श्री.सटाणकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. श्री.पवार,सौ.आळकुटे यांच्या कार्याचा आणि श्री.सटाणकर यांची ४१वर्षापासूनची आदर्श पत्रकारितेचा उल्लेख यावेळी करण्यात आला.शहर काॅंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि भिंगार काॅंग्रेसचे अध्यक्ष  ॲड.आर. आर.पिल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या यासोहळ्यात सर्वश्री अाल्पसंख्याकं प्रदेश सरचिटणिस फिरोज शफी खान,पक्षाचे शहर जिल्हा उपध्यक्ष बाळासाहेब भंडारी,प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर,अरुण धामणे,हरिभाऊ डोळसे,नागेश शिंदे,अाभिजित कांबळे ,रवी सुर्यवंशी ,भिंगार महिला अध्यक्षा मार्गरट जधव श्रीमती रजनी ताठे आदिंची समयोचित भाषणे झाली. यास्नेहमेळाव्याचे रुपांतर ६ जानेवारीमुळे पत्रकार दिनात झाले.शेवटी कवी विवेक येवले यांनी आभार मानून कार्यक्रमाला पूर्णविराम दिला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News