समाजामध्ये सुधारणा करण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत : डॉ.क्षितिज घुले


समाजामध्ये सुधारणा करण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत : डॉ.क्षितिज घुले

शेवगाव : शेवगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमीत्त पत्रकार जीवन गौरव पुरस्कार जगन्नाथ गोसावी, भगवान देशपांडे व याकुब शेख यांना पुरस्कार प्रदान करतांना मान्यवर आदी.  ( छायाचित्र : गणेश देशपांडे)

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण , शेवगाव,ता.६: समाजामध्ये सुधारणा करण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत आहे. त्यामुळे ती लेखणी पत्रकाराने जबाबदारीनेच वापरायला हवी. दिवसेंदिवस वृत्तपत्र आणि माध्यमांसमोरील आव्हाने वाढत चालली असल्याने नव्या बदलासाठी माध्यमांनी तयार रहायला हवे, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती डाँ. क्षितीज घुले यांनी केले.

       शेवगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमीत्त बुधवार ता.६ रोजी पत्रकार जीवन गौरव पुरस्कार व तालुक्यातील विविध क्षेत्रात योगदान देणा-या व्यक्ती व संस्थांचा गुणगौरव समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी डाँ. घुले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे होते.

यावेळी मा.आ.चंद्रशेखर घुले, जनशक्ती मंचचे संस्थापक अँड. शिवाजीराव काकडे, जिल्हा परीषद सदस्या हर्षदा काकडे, बाजार समितीचे सभापती अनिल मडके, अरुण लांडे, तहसिलदार अर्चना भाकड, गट विकास अधिकारी महेश डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, काकासाहेब नरवडे,

संजय फडके, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, ताहेर पटेल, वंचीतचे किसन चव्हाण, पत्रकार संघाचे समन्वयक भगवान राऊत, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक सागर फडके, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अविनाश मगरे, राहुल देशमुख, शितल पुरनाळे आदी प्रमुख उपस्थित होते.

        यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार भगवान देशपांडे,जगन्नाथ गोसावी, याकुब शेख यांना जीवन गौरव पुरस्कार तर तालुक्यातील विविध क्षेत्रात योगदान देणा-या माहेश्वरी समाज मंडळ, इन्सानियत फाऊंडेशन, आरोग्य अधिकारी डाँ. अतुल शिरसाठ, पो.ना. राजू चव्हाण, चित्रकार शितलकुमार गोरे, उदयोजक महेश बोडखे आदींचा विशेष पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यावेळी संजय कोळगे, अरुण मुंढे, किसन चव्हाण, विजय जोशी, निळकंठ कराड, प्रकाश भंडारे आदींची भाषणे झाली.

       हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब बर्गे, नानासाहेब चेडे, सचिव सचिन सातपुते, मिडीयाचे तालुकाध्यक्ष संदिप देहाडराय, सचिव अलीम शेख, सुनिल आढाव, महादेव दळे, शाम पुरोहीत, विजय लड्डा, गणेश देशपांडे, अनिल खैरे, विजय धनवडे, दिपक खोसे, शहाराम आगळे, लक्ष्मण मडके, रविंद्र मडके, दिलदार शेख, राजेंद्र देशपांडे, ऋषिकेश घुसाळे, धर्मादास ढाकणे, किरण तहकिक, युसुफ शेख, कुंडलीक घुगे, शंकर गुठे आदींनी प्रयत्न केले. उपस्थित पत्रकारांना राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत यांच्या हस्ते मास्क चे वाटप करण्यात आले.

     कार्यक्रमाचे प्रास्तविक पत्रकार संघाचे अध्यक्ष कैलास बुधवंत यांनी तर सुत्रसंचालन राजू घुगरे यांनी केले. तर बाळासाहेब पानकर यांनी आभार मानले.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News