महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना


महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक* 

 गेल्या अनेक दिवसापासून अनाथ व मुका असलेल्या इसमाला साखळीने बांधून ठेवून त्याच्याकडून स्वयपाकाचे काम करुन घेतले जात आहे. याच पुण्यात राहात असलेल्या धाबा मालकाच्या भावाला तो गावी गेल्यावर हे दृष दिसते तेंव्हा हसन तांबुळी हे नळदुर्ग पोलिस ठाणे उस्मानाबाद यांना याची माहिती कळवीतात पोलिस स्वता तेथे येतात या पिडीताला साखळ दंडातून सुटका करतात मात्र गुन्हा नोंद करत नाहीत. याचा राग धाबामालक असलेल्या भावाला येतो व पोलिसांना कळविले म्हणुन स्वताच्या भावाला भांडन करत मारहान करतो. हसन तांबोळी यांनी या घटनेबाबत आमच्या संस्थेचे पदाधिकारी महादेव सुर्यवंशी यांना सदर घटनेची माहिती देत त्याचे व्हिडीओ पुरावा म्हणुन पाठवले त्यांनी ते मला पाठवले त्यावरुन पोलिस अधिक्षक उस्मानाबाद यांना सदर घटनेबाबत मानवतेला काळींबा फासणा-या व मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या या घटनेचे व्हिडीओ पाठवले व गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. त्यानंतर नळदुर्ग पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री राऊत यांना फोन केल्यावर आता पिडीताला पाठावा गुन्हा नोंद करतो असे सांगितले त्यानुसार पिडीत व घटनेची माहिती देणारे हसन तांबुळी यांना नळदुर्ग पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले आहे. त्यावर गुन्हा नोंद होईलच पण मानवी हक्कांचे अशा प्रकारे होत असणारे हनन ही खरोखरच दुर्दैवी आहे. पोलिस अधिकारी यांना घाटनेची माहिती होवून ही गुन्हा नोंद होत नाही ही तर त्यावहून भयंकर आहे. यातील पोलिस अधिकारी यांनी कर्तव्यात कसुर केल्याने त्यांच्यावर ही गुन्हा नोंद होवून कारवाई झाली पाहीजे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News