तालुक्याच्या विकासासाठी पत्रकार व लोकप्रतिनिधी यांच्यात सुसंवाद आवश्यक - आमदार मोनिका राजळे.


तालुक्याच्या विकासासाठी पत्रकार व लोकप्रतिनिधी यांच्यात सुसंवाद आवश्यक - आमदार मोनिका राजळे.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

लोकप्रतिनिधी व माध्यमे यांच्यातील विसंवाद गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याने विकासकामाची परीणामकारकता प्रभावी पणे पुढे येत नाही, त्यामुळे आगामी काळात विविध प्रकारच्या माध्यमांबरोबर संवाद वाढवून विकासकामांना गती दिली जाईल. पत्रकार दिनाचे औचित्य साधून वृद्धश्रमातील उपेक्षितांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, असे मत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केले. 

        शेवगाव-पाथर्डी रोडवरील दादाजी वैशंपायन नगर येथील वृधश्रमात तालुक्यातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या  वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार राजळे बोलत होत्या. कार्यक्रमास राम महाराज झिंजूरके, हभप बोरुडे महाराज, आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार चंद्रशेखरभाऊ घुले, पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शिवाजीराव काकडे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल मडके, काकासाहेब नरवडे, शिवाजीराव देवढे, संजय फडके, संजय कोळगे, उपनगराध्यक्ष वजिर पठाण, नगरसेवक कमलेश गांधी, सागर फडके,विकास फलके, अजय भारस्कर, हरिष भारदे, मिलिंद कुलकर्णी, एजाज काझी, प्रताप फडके, डॉ.अमोल फडके, प्रशांत फडके, दत्ता फुंदे, बाळासाहेब फटांगडे, तहासिलदार अर्चना पागिरे, गट विकास अधिकारी महेश डोके, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, प्रशांत भराट,आत्माराम कुंडकर, संदीप बामदळे, अर्जुन फडके, गणेश रांधावणे, संजय नांगरे, तुषार पुरनाळे, शीतल पुरनाळे, उदय शिंदे, माणिक म्हस्के, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वृद्धआश्रमातील जेष्ठ नागरिकांना धान्य, किराणा, कपडे, फळे, सतरंज्या आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमावेळी बोलतांना हभप राममहाराज झिंजूरके, बोरुडे महाराज, प्राचार्य शिवाजी देवढे, गणपत कराड यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने जेष्ठ वृत्तपत्र वितरक व पत्रकार विनोद गांधी यांना मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

       यावेळी बोलतांना सभापती क्षितिज घुले म्हणाले की, शेवगाव तालुक्याच्या विकासात तालुक्याच्या पत्रकारांचे मोठे योगदान आहे. कोरोना काळात जीवावर उदार होऊन केलेली समाजसेवा जिल्ह्यात लक्षवेधी ठरली आहे. ग्रामीण पत्रकारांनी लोक प्रश्नांचा अभ्यास करुन समस्या राज्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. ग्रामीण भागातील लोकांशी पत्रकारांचा असलेला संवाद राजकीय कार्यकर्त्यांपेक्षा अधिक प्रभावी असतो. तालुक्यातील विविध प्रश्न पत्रकारांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्याचे गौरवोद्गार सभापती क्षितीज घुले यांनी काढले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसह अविनाश मंत्री,जनार्दन लांडे, निळकंठ कराड,रमेश चौधरी, अनिल साठे,राउसाहेब मरकड,रवींद्र उगलमुगले, रामनाथ रुईकर,सुनील नजन,बाळासाहेब जाधव,नजन रेवननाथ,दादा डोंगरे,निजाम पटेल,सज्जाद पठाण,प्रवीण खोमणे,सुनील रणमले,जयप्रकाश बागडे,युनूस शेख,शेख इसाक,किरण तहकीक,धर्मराज ढाकणे,लक्ष्मण झिंजुर्के,अशोक वाघ,शंकर मरकड,भगवान मिसळ,संजय लहासे,प्रवीण खरड,चंद्रशेखर शेटे, सलीम पठाण,बाळासाहेब धस, अजय नजन, दादा पाचरणे, तसेच तालुक्यातील पत्रकार संघटनाचे पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, सूत्रसंचालन उमेश घेवरीकर तर आभार महाराष्ट्र राज्य पगकार संघाचे तालुका अध्यक्ष दादासाहेब डोंगरे यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News