सामाजिक कार्यकर्त्या स्मिता गायकवाड यांची पुणे शहर भाजपा ओबीसी आघाडी उपाध्यक्ष पदी निवड


सामाजिक कार्यकर्त्या स्मिता गायकवाड यांची पुणे शहर भाजपा ओबीसी आघाडी उपाध्यक्ष पदी निवड

विठ्ठल होले विषेस प्रतिनिधी :

- पुणे हडपसर येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच  स्मित फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ स्मिता तुषार गायकवाड यांची भाजपच्या  ओबीसी आघाडी  उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली,सकाळी 10 वाजता भारतीय जनता पार्टी च्या पुणे शहर ओबीसी मोर्चा च्या नवीन पदाधिकारी निवडी जाहिर करण्यात आल्या. सदर कार्यक्रम भारतीय जनता पार्टी च्या शहर कार्यालय हाॅटेल सन्मान येथे ऊत्साहात पार पडला. स्मित फाउंडेशनच्या माध्यमातून स्मिता गायकवाड या सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत आहेत, यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोजगार मेळावा आयोजित करून 150 जॉबकार्ड वाटप केले आहे,सदर प्रसंगी  शहराध्यक्ष श्री जगदिशजी मुळीक, ओबीसी मोर्चा चे शहराध्यक्ष श्री योगेश पिंगळे, श्री रवीजी अनासपुरे - संघटनमंत्री भाजपा, ओबीसी मोर्चा पुणे शहर प्रभारी श्री गणेश कळमकर, श्री राजेश पांडे, श्री गणेश घोष, श्री राजेश येनपुरे, श्री संदीप लोणकर, श्री विनोद मोहिते, श्री माने साहेब, श्री शंतनु नरके, नुतन पदाधिकारी आणि ओबीसी मोर्चा चे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News