राममंदिर निर्माणासाठी मकर संक्रांती ते माघी पौर्णिमेपर्यंत निधी समर्पण अभियान राबविणार


राममंदिर निर्माणासाठी मकर संक्रांती ते माघी पौर्णिमेपर्यंत निधी समर्पण अभियान राबविणार

नगर :(प्रतिनिधी संजय सावंत) अयोध्येत श्रीराम जन्म भूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने राम मंदिराचे कार्य आता गतिमान झाले असून ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधानांनी श्रीराम जन्म भूमीच्या जागी भूमिपूजन व शिला पूजन करून कामाचा श्रीगणेशा केला. या कार्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असून त्यात राम भक्तांचा सहभाग निश्चित कारण्यासाठी न्यासाच्या विनंती वरून मकर संक्रांति ते माघी पौर्णिमे पर्यंत म्हणजेच १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत निधी समर्पण अभियान देशभर चालवण्यात येणार आहे.. या अभियानातून देशभरातील ४ लाख गाव तसेच११ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले आहे.अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त मंत्री दादा वेदक यांनी पत्रकार परिषदेत दिली.      

या पत्रकार परिषदेस पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी , राम जन्मभूमी निधी संकलनाचे प्रमुख गजेंद्र सोनावणे , प्रांत संघ चालक नानासाहेब जाधव. डॉ.रवींद्र साताळकर , शहर संघ चालक शांतीभाई चंदे , जिल्हा कार्यवाहक श्रीकांत जोशी ,, रामदास महाराज क्षीरसागर , जिल्हा वि.हि.पचे ॲड जय भोसले ,  अनिल रामदासी , राजेश झंवर , महेंद्र चंदे , निलेश लोढा,  अमोल भांबरकर आदी उपस्थित होते.   

 या निधी संकलनात पारदर्शकता यावी यासाठी रुपये एक हजार , रुपये शंभर, आणि १० रुपयांच्या कूपन्सची रचना करण्यात आली आहे.याशिवाय ऑनलाईन निधी समर्पण व्यवस्था करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात सुरु करण्यात आलेल्या या अभियानात सर्व संप्रदाय, जात-पंथ , स्थानिक व परदेशातील भाविक सहभागी होणार आहेत. देशातील अति दुर्गम भागापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. दक्षिण नगर जिल्ह्यात ८३२ गावांमध्ये ३ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी १० हजार राम भक्त कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.         

प्रस्तावित मंदिर ३ मजली असून मंदिराची एकूण उंची १६१ फूट, लांबी ३६० फूट आणि रुंदी २३५ फूट असणार आहे. २.७ एकर जागेवर हे मंदिर उभे राहणार आहे. सम्पूर्ण मंदिराचे बांधकाम दगडी असून तीन ते साडेतीन  वर्षात ते पूर्ण होणार आहे. तेथे जागतिक सांस्कृतिक राजधानी निर्माण होईल. असे दादा वेदक म्हणाले .

             

जाहिरात
Search
विडिओ
Recent News