बांधकामाची गुणवत्ता आणी नियमानुसार बांधकाम केल्यास व्यवसायात यश निश्चित !! माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील


बांधकामाची गुणवत्ता आणी नियमानुसार बांधकाम केल्यास व्यवसायात यश निश्चित !! माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

कोपरगाव - बांधकाम व्यवसाय करण्या साठी कोपरगाव शहरालगत खूप जागा असुन अनेक उपनगरे आहेत. शहराजवळुन जात असलेल्या नगर - मनमाड महामार्गाच्या दोन्ही बाजुस शहर वाढीस मोठा वाव असुन समृद्धी महामार्गाचा नागपुर ते शिर्डी हा पहीला टप्पा लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत त्याचे लँडिंग शहरानजीक जेऊर कुंभारी परीसरात होत असल्याने त्याचा फायदा कोपरगाव शहर वाढीस होणार आहे.येथे शैक्षणिक हब असुन शांत परिसर या मुळे शिर्डी तील बरेच लोक कोपरगाव ला राहायला पसंती देत आहेत. लोकसंख्या वाढीमुळे घरे लहान पडत आहेत.शिक्षण व  असल्याने कोपरगाव शहराच्या वाढीस मोठा वाव असल्याने भविष्यात बांधकाम व्यवसायास सुगीचे दिवस येणार असुन बांधकामाची गुणवत्ता आणि नियमानुसार बांधकाम केले तर यश आणि पैसा दोन्ही मिळणार असल्याने तरूणांनी बांधकाम व्यवसायात उतरावे असे प्रतिपादन कोपरगावचे माजी नगराध्यक्ष व बांधकाम व्यावसायिक मंगेश पाटील यांनी केले आहे 

 कोपरगाव शहरातील समतानागर भागात खापेकर बंधूंच्या रुद्रा कन्स्ट्रशन बिल्डर अँड डेव्हपर या नूतन ऑफिसचे उद्धघाटन मंगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोलताना

ते पुढे म्हणाले कि रवींद्र खापेकर व नवनाथ खापेकर बंधू यांनी कष्टातुन आपले विश्वनिर्माण केले असुन तरुण पिढीसमोर एक आदर्श ठेवला असल्याचे सांगत त्यांनी खापेकर बंधुना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री शेखर राहणे,अडँ.श्री सुशांत क्षीरसागर,श्री गुंजाळ साहेब,श्री मनोहर शिंदे, श्री महारुऊ चव्हाण,श्री विलास महिरे, श्री मोहन रासकर, श्री सुमेश हांडे,श्री चंद्रकांत शेजुळ, श्री गोविंद आढळ,श्री अशोक उंडे, श्री गोकुळ वाघ,श्री नारायण चौरे, श्री शिवाजी मगर (ग्रा.से.), श्री पाटील साहेब(ग्रा.से.),श्री राजेश गुंड, श्री रमेश पवार,श्री ज्ञानेश्वर खैरनार, श्री मंगेश शिंदे, श्री भैरव वाघेला,श्री दिपक नाईकवाडे, श्री दिपक मांडगे, श्री गणेश कुहिले, श्री राहुल गरकल, श्री विजय खंडिझोड, श्री ससाणे सर, श्री राजेंद्र खुटे, श्री मनोज डोखे(इंजिनिअर.)श्री गणेश पवार, श्री शरद शिंदे, श्रीअजय सूर्यवंशी, श्री दादासाहेब कराळे, श्री राजेश बढे, श्री सिद्धार्थ खंडिझोड, श्री तुषार गांगुर्डे, श्री बाळासाहेब शिंदे, श्री बाळासाहेब मुंगसे, श्री हारून पठाण, श्री साजिद शेख, श्री सतिश , तुषार साठे, विकी आहेर, श्रेयस शिंदे, अमर शिंगाने, हर्षल साठे,मंगेश देवठक,इतर मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News