सौ.रोहिणी उदास यांच्या दोन कविता संग्रहाचे प्रकाशन


सौ.रोहिणी उदास यांच्या दोन कविता संग्रहाचे प्रकाशन

कवयित्री रोहिणी शिरिष उदास यांच्या "तुझा विसन न व्हावा" व "भवताल वेचतांना" या कविता संग्रहाचे प्रकाशनप्रसंगी कवी चंद्रकांत पालवे, लेखक सदानंद भणगे, शिरिष उदास, कवयित्री सौ.रोहिणी उदास.

संसार सांभाळून कवितेचा छंद जोपासणे कौतुकास्पद-चंद्रकांत पालवे

     नगर (प्रतिनिधी संजय सावंत) - कवयित्री रोहिणी शिरीष उदास यांच्या "तुझा विसर न व्हावा" व "भवताल वेचतांना" या कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच मर्यादित मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले. याप्रसंगी कवी चंद्रकांत पालवे, लेखक सदानंद भणगे, नंदलाल जोशी, सर्वोत्तम क्षीरसागर, शिला हककुंडे, पुष्पा चिंताबर, सरिता उदास, सुरेखा रुपमांगद, शरद गोडबोले, अ‍ॅड. चौधरी, सुषमा जोगळेकर, अमिता जोशी, सौ.भणगे, श्री.व सौ.तांबडे आदि मान्यवर उपस्थित होते.

     याप्रसंगी कवी चंद्रकांत पालवे म्हणाले, कवयित्री रोहिणी उदास यांच्या कवितांमधून अंत:प्रेरणेचे झरे कायम झरत असतात. त्यांच्या प्रसन्नचित्र स्वभावाने कवितासुद्धा आनंददायी होतात. भवतालात घडणार्‍या अनेक सत्य घटनांना त्या स्पष्ट करतात. निसर्गाचे सौंदर्य, स्त्रियांविषयीचा अभिमान त्या कवितेत व्यक्त करतात. संसार सांभाळून कवितेचा छंद जोपासणे कौतुकास्पद आहे, असे सांगून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी लेखक सदानंद भगणे म्हणाले, कवितेला वयाचे कुठलेही बंधन नसते. ती एक उर्मी, स्फुर्ती असते. अशा अर्थपूर्ण, भावपूर्ण वैचारिक कविता आजकाल वाचायला मिळत नाही. त्यांच्या कविता गेय स्वरुपाच्या असून मनाला भुरळ घालतात. "तुझ्या विसर न व्हावा" या संग्रहातून परमेश्‍वराचे अस्तित्व सर्वत्र आहे. ते मानवाने मान्य करुन भक्तीभाव व मनी ठेवावा, असे त्या वेळोवेळी सांगतात.

     कवयित्री सौ.रोहिणी उदास मनोगतात म्हणाल्या, "स्वानंद" वाचन मंडळातल्या माझ्या मैत्रिणी, नातेवाईक यांच्या प्रोत्साहामुळे माझ्यातली कवयित्री घडत गेली. भवताल वाचण्याची आणि वेचण्याची एक नवी दृष्टी मिळाली, त्यामुळे कविता आकारत गेली.

     यावेळी काही भक्तीकाव्यांना चाली देऊन सौ.शुभांगी गोडबोल यांनी गोड आवाजात गाऊन दाखवल्याने कार्यक्रम आणखी बहारदार झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष उदास यांनी केले तर आभार शिरिष उदास यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News