श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल विद्यालयात २५० रुक्षांची लागवड


श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल विद्यालयात २५० रुक्षांची लागवड

राहुरी फॅक्टरी महाराष्ट्रभुमी प्रतिनिधी

माझी वसुंधरा या महाराष्र्ट शासनाच्या अभियानांतर्गत अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल व ज्युनियर कॉलेज श्रीशिवाजीनगर, या विद्यालयाच्या प्रांगणात देवळाली नगरपालिकेच्या वतीने २५० वृक्षांची लागवड करण्यात आली.

     त्याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने सर्व प्रथम सर्व मान्यवरांचे यथोचित सन्मान करण्यात आले.या प्रस्तुत प्रसंगी देवळालीप्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.अजित निकत यांनी अभियाना अंतर्गत एकूण ५००० वृक्ष लागवड करण्याचा नगरपालिकेचा मानस आहे तसेच त्यांचे संवर्धन व जोपासना नगरपालिकेच्या वतीने करण्यात येईल असे आपल्या मनोगतात सांगितले.प्रथम सर्व उपस्थितांना वृक्ष लागवड व संवर्धनाची प्रतिज्ञा देण्यात आली.यावेळी नगरसेवक श्री. आण्णासाहेब चोथे,श्री.आदिनाथ कराळे,श्री.ज्ञानेश्वर वाणी,नगरसेविका सौ.सुजाताताई कदम,विद्यालयाचे प्राचार्य गंगाधर म्हसे शिक्षक प्रतिनिधी साळवे मॅडम ज्येष्ठ शिक्षिका मुसमाडे मॅडम शिक्षकेतर प्रतिनिधी भाऊसाहेब पगारे यांचे समवेत सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक वृंद तसेच नगरपालिका कर्मचारी रुंद उपस्थित होते.

     याप्रसंगी सर्व कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक कमिटीने केले.प्रस्तावना व सुत्रसंचलन एन.सी.सी.आँफिसर संदिप गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.बाबासाहेब शिरसाठ यांनी मांडले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News