डाऊच खुर्द गावात अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन॥ ग्रामस्थ बालमभाई सय्यद यांनी अंगणवाडीसाठी दिली जागा ॥


डाऊच खुर्द गावात अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन॥ ग्रामस्थ बालमभाई सय्यद यांनी अंगणवाडीसाठी दिली जागा ॥

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द गावचे रहिवासी बालमभाई सय्यद आपल्या मालकीच्या जागेपैकी एक गुंठा जागा अंगणवाडी इमारतीसाठी दिली आहे .

 आज त्या जागेवर अंगणवाडी इमारतीचे भुमिपुजन जागा मालक बालम सय्यद व लोकनियुक्त सरपंच संजय गुरसळ यांचे हस्ते पार पडले.

यावेळी बालंम सय्यद यांचा ग्रामस्थांच्या वतीने सरपंच संजय गुरसळ यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. 

जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन निधी अंतर्गत  सदर   इमारतीचे बांधकाम होणार असुन या शाळेच्या इमारत बांधकामासाठी  निधी मिळावा यासाठी लोकनियुक्त सरपंच संजय गुरसळ यांचा पाठपुरावा सुरू होता.या आर्थिक वर्षात डाऊच खुर्द जिल्हा परिषदेच्या अंतर्गत अंगणवाडी शाळा इमारतीसाठी निधी मंजूर झाला आहे.अंगणवाडी शाळेच्या इमारती अभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी निधी मंजूर होताच तात्काळ कामाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी लोकनियुक्त संजय गुरसळ,ग्रामसेवक जालीदर पाडेकर,बालमभाई सय्यद , चंद्रकांत गुरसळ,कल्याणराव गुरसळ ,सलिमभाई शेख, सलिमभाई सय्यद, मोसिन सय्यद(सर )तुळशिदास गुरसळ,सुनिल गुरसळ, मच्छिंद्र गुरसळ ,सिताराम गुरसळ ,मानिक चव्हाण अर्जुन होन, दिगंबर पवार ,देवा पवार ,मेहबुब सय्यद आदि उपस्थित होते .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News