आपल्या घराण्यातला, आडनावाचा सरपंच, आपल्या गटाचा, आपल्या पार्टीचा , आपल्या ऐकन्यातला, यातच... ग्रामपंचायत निवडणुक आणि या षडयंत्रात सापडलेला गावचा समाज


आपल्या घराण्यातला, आडनावाचा सरपंच, आपल्या गटाचा, आपल्या पार्टीचा , आपल्या ऐकन्यातला, यातच...  ग्रामपंचायत निवडणुक आणि या षडयंत्रात सापडलेला गावचा समाज

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

एक काळ असा होता की, ठराविक समाज गावावर सत्ता घेऊन होता, शेकडो एकर जमिनींचा मालक होता पण भविष्याचा अभ्यास करून याच समाजाने गावातील घरे, शेकडो एकर जमीनी विकून तात्काळ शहरी भागात आपले बस्थान बसविले आणि आपली मुले उच्च शिक्षत करून प्रदेशात पाठवली व आपली पकड शिक्षण क्लासवन च्या नोकरीवर ताबे मिळवले  त्यावेळी सर्व गावकरयांनी यांना वेड्यात काढले व एक मूर्खात काढण्याचा विषय केला.पण आजची परिस्थिती काय??  गावातील लोकांची अवस्था जशीच्या तशी तर यांची परिस्थिती मात्र हा समाज कोट्याधीश झालेली आहे. हा समाज कधीच निवडणुक या भानगडीत पडत नाही व कुठलीही ग्रामपंचायत लढवत नाही तरी देशाच्या राजकारणात अभ्यासपूर्वक पडलेला दिसेल....

केंद्रस्थानी आहे व अंतिम निर्णय क्षमता घेण्याचा अधिकार शिक्षण आणि राजकीय वर्चस्व ठेऊन आहे...

हे आपल्या ग्रामपंचायतीच्या राजकारणात आयुष्य संपवणारे महाभागांना काय कळणार ???

        गावचा विकास अथवा प्रगती या मुद्यावर मुळातच गावची निवडणुक हि नसते ती असते घराणेशाही, पार्टी हित व स्व हित. यातून गावाच्या प्रगतीचे स्वप्ने सर्व सामान्यांना जरूर दाखविली जातात पण वास्तवात घडते ते वेगळेच. *साधा उमेदवारी अर्ज कसा भरायचा याची माहिती देखील नसणारे सरपंच पदासाठी आशावादी असतात,* घरपट्टी, पाणीपट्टी व अगदी उमेदवारी अर्ज भरताना देखील काहीजन इतरांकडून पैशे  घेतात यामूळे अशे व्यक्ती गावाला दिशा देतील हा विचार करणे देखील मूर्खपणाचे आहे. उमेदवारी अर्ज भरताना काही उमेदवार अगदी टक्केवारीने अथवा सावकार किंवा मित्रांकडून पैशे घेतात अर्थात हा पैसा हा फक्त दलाली करण्यासाठीच घेतलेला असतो.स्वत:च्या गाडित पेट्रोल टाकायला, मुलांचे शिक्षण पूर्ण करायला, घराची सर्व जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळायला अपयशी ठरलेली माणसेच या भानगडीत अधिक  पडलेली दिसतात. आणि ज्यांच्याकडे पैसा असतो तो इतर व्यवसायाचा असतो तो व्यावसायाचा पैसा निवडणुकीत वापरून त्या व्यवसायाशी गद्दारी करणारी दुसरी माणसेही या क्षेत्रात सापडतात. म्हणजे ज्याची सुरूवातच मुळातच नियतिच्या विरोधात होते अशा व्यक्तीचा व त्याच्या व्यवस्थेचा अंतही नियतिच्या विरोधातच होणार हे निश्चित. अनेक माजी सरपंच आज गाडीत पेट्रोल टाकायला, घराचा किराणामाल भरायला,मुलांना उच्चशिक्षण द्यायला सक्षम नाहीत कारण सर्व सामान्यांचा मिळालेला तळतळाट. कारण सरपंच अथवा त्याभागाचा निवडून आलेला सदस्य यांची जबाबदारी इतकी मोठी असते की त्या लोकांना व त्यांच्या परिस्थितीला न्यायच देता आला पाहिजे पण वास्तवात हे घडत नाही.

      आज IAS, IPS अथवा एकुणच स्पर्धा परिक्षांमध्ये गावातील मुलांचा सहभाग हा अगदीच नगण्य असतो व त्यातून निवडला जातो तो एखादाच. कारण ज्या गावात शैक्षणिक प्रगती, व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र,भविष्य नियोजन समिती,भ्रष्टाचार विरोधी संघ, किंवा अशा अनेक मुद्याचा थांगपत्ता नाही तीथे क्रांती होईल हे स्वप्न देखील पाहू नये.

काही महाशय पद भोगूनही परत बायकोचा अर्ज भरतात व त्यायोगे परत मलाच राज्य करता यावे हि नारदीय खेळी आखतात. 

आपली व गावाची सर्वांगीण प्रगती जर गावातील ग्रामपंचायत मार्फत करायची असेल तर ग्रामसभा हा एक उत्तम पर्याय आहे. या ग्रामसभेत अतिशय उच्चशिक्षित, सुशिक्षित, चरित्रवाण,निर्व्यसनी व स्वतः चे आयुष्य यशस्वी आणि सक्षम करू शकणारे उमेदवार निवडावे,याने गावाची प्रगती करायला पाच वर्षांची गरजच पडणार नाही व यातून जी प्रगती होईल ती नियतीला मान्य असणारी होईल.

ग्रामीण व्यवस्थेला नासवायचे म्हणूनच व याच उद्देशाने काहीजन मुद्दाम उमेदवारी अर्ज 

भरतात यांमुळे तर सर्वाधिक धोका ग्रामीण व्यवस्थेला होतो. 

वेळेतच सावध व्हा. पिढ्याण पिढ्या गावातच राहायचे असेल तर निवडणुक विषय गांभीर्याने घ्या व विचार करा. आणि खरच उच्चस्तरीय भविष्य हवे असेल तर ग्रामसभा बोलावून 

गावातील सर्वच समाजांतील घटकांना एकत्र विश्वासात घेऊन.... 

*“बिनविरोध निवडणूक अभियान ”* राबवा. यातून गावाला आवडणारया व्यक्तींना संधी द्या, सुशिक्षित, निर्व्यसनी, चरित्रवाण, अभ्यासू व स्वतः चे आयुष्य सक्षम केलेल्या व्यक्तींना संधी द्या मग बगा गावाचे असंख्य प्रश्न कायमचे मिटतील. 

गावची व्यवस्था नासवायची या उद्देशाने भरलेले उमेदवारी वेळेतच  काढून घ्या अन्यथा गावचे भविष्य तुम्हाला माफ करणार नाही अशी माहिती मुनिर तांबोळी... बारामती

मानवी हक्क कार्यकर्ते यांनी दिली..

जाहिरात
Search
विडिओ
Recent News