वाकी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध


वाकी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

वाकी ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर एकत्र आलेले नवनियुक्त सदस्य,  ग्रामस्थ व पदाधिकारी.

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील वाकी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक  बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.ए. कांबळे  यांनी दिली.

           वाकी ग्रामपंचायतीसाठी ९ जागांसाठी १६ अर्ज दाखल झाले होते. परंतु गावात एकोपा व विकास व्हावा यासाठी सर्वांनी निर्णय घेऊन ९ ही उमेदवार बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. 

बिनविरोध झालेले सदस्य पुढीलप्रमाणे

वार्ड नंबर १

निकिता अनिल भंडलकर, वर्षाराणी सुनील जगताप, सुधीर दिलीप गायकवाड

वार्ड नंबर २

सुनीता लक्ष्मण जगताप, इन्द्रजित भुजंग जगताप, किसन दशरथ बोडरे

वार्ड नंबर ३

हनुमंत मानसिंग जगताप, शालन विठ्ठल जगताप, कल्पना गोरख जगताप

      यंदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व जेष्ठांनी व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. : 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News