कारसह देशी विदेशी दारूचा साठा जप्त,पाण्याच्या जार मधून गावठी दारू ची वाहतूक, सुमारे सव्वादोन लाखाचा माल जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई


कारसह देशी विदेशी दारूचा साठा जप्त,पाण्याच्या जार मधून गावठी दारू ची वाहतूक, सुमारे सव्वादोन लाखाचा माल जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

 --दौंड तालुक्यातील  राहू टाकळी रोड पाटेठाण येथे कार सह दारू वाहतूक करणाऱ्यास ताब्यात घेऊन एक आरोपी व २,२५,५३४/- रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले.

       पुणे ग्रामीण जिल्हयात ग्रामपंचायत निवडणुकीचे अनुषंगाने अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहा.पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोहवा. महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, पोना. गुरू गायकवाड यांचे पथक दिनांक ०४/०१/२०२१ रोजी दौंड यवत पोलीस स्टेशन हद्दीत राहू-टाकळी रोड येथे पेट्रोलिंग करीत असताना सदर पोलीस पथकास खबऱ्या मार्फत बातमी मिळालेने मौजे  पाटेठाण गावचे हददीत राहू-टाकळी रोड, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याजवळ, टाकळी चौक ता.दौंड जि.पुणे येथे इसम नामे *सुरज निवास किरो वय ३४ वर्षे रा.पाठेटाण ता.दौंड जि.पुणे*  यास  चार चाकी झेन कार सह ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातील मारुती झेन कार नं.एमएच १२ बीजी ४२१९  हिची पोलीसांनी पाहणी केली असता  सदर चार चाकी झेन कार मध्ये बेकायदा बिगरपरवाना *देशी विदेशी व गावठी हातभट्टी दारू चा साठा मिळून आला असून देशी व विदेशी दारू कि.रु. २५,५३४/- व  कारसह एकूण किं. २,२५,५३४/- (दोन लाख पंचवीस हजार पाचशे चौतीस)* रुपयांचा मुद्देमाल सह वाहतुक करीत असताना मिळून आलेला आहे.

     सदर आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला असून  मुद्देमाल  व आरोपी हा यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला आहे. सदर अवैध दारूसाठा कोठे विक्रीसाठी नेणार होता? याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजिंक्य दौंडकर हे करीत आहेत.

       आरोपी सुरज किरो हा झेन कार मध्ये अवैध दारू वाहतूक करीत असताना गाडीचे शीट खाली दारूचे बॉक्स ठेवत असे व पोलीसांना संशय येऊ नये म्हणून बॉक्सचे वर भाजी पाला ठेवत असे तसेच पिण्याचे पाण्याचे प्लास्टिक जार मध्ये गावठी हातभट्टीची दारू भरून  वाहतूक करीत होता.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News