शेवगाव नगरपरिषदेची निवडणूक लढण्याच्या तयारीला लागा : ना.श्री बाळासाहेब थोरात साहेब


शेवगाव नगरपरिषदेची निवडणूक लढण्याच्या तयारीला लागा : ना.श्री बाळासाहेब थोरात साहेब

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

दि. २ जानेवारी रोजी संगमनेर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष म हसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात साहेब, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार लहुजी कानडे, अहमदनगर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, समन्वयक ज्ञानदेव जी वाफारे, संगमनेर नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, अहमदनगर जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर आदी उपस्थित होते.

शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्या नेतृत्वाखाली तालुका कमिटीने नगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी अतिक्रमण कायम करण्यात यावे व तालुक्यातील महसूल  विभागाशी संबंधित इतर निवेदन नामदार थोरात साहेब यांना दिले. नामदार थोरात साहेबांनीही सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी पूर्णपणे कार्यवाही करू असे आश्वासन दिले.

"आगामी शेवगाव नगरपरिषदेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याच्या डॉ. अमोल फडके यांच्या मागणीवर नामदार थोरात साहेबांनी सकारात्मकता दाखवत पक्ष तुमच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे" असे आश्वासन दिले. तसेच तालुक्यातील 12 ग्रामपंचायती मध्ये काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने लढणार असल्याची माहिती नामदार थोरात साहेबांसमोर समोर मांडण्यात आली. यावेळी शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तालुका अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्या समवेत अहमदनगर जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हा सचिव प्रा. शिवाजीराव काटे, सेवादल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामकिसन कराड, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किशोर कापरे, उपाध्यक्ष पांडुरंग नाबदे, अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे तालुका सचिव शोएब पठाण, युवक अध्यक्ष बब्रु वडघने, युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सोपान घोरतळे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष लक्ष्मण अभंग, एन.एस.यु.आयचे महेश काटे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, अल्पसंख्यांक युवक काँग्रेसचे जब्बार भाई शेख आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News