वाहतुकीचे नियम मोडल्यास कारवाही होणार..पो.नि.न्याहळदे


वाहतुकीचे नियम मोडल्यास कारवाही होणार..पो.नि.न्याहळदे

शिर्डी,राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी

शिर्डी ही साईबावांची पुण्यनगरी असल्याने या भागात साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या सईभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्या मुळे वाहतूक कोंडी होणारणाही याची काळजी वाहनचालकांनी घेतली पाहिजे,कोणत्याही भक्तांला त्रास होऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे,असे प्रखर मत शिर्डी  वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे यांनी वेक्त केले ,सावळीविहिर येथील अपेरिक्षा चालकांच्या वतीने शिर्डी येथे नव्याने रुजू झाकले पो.नि,न्याहळदे याचा नुकताच  सत्कार करण्यात आला, या वेळी विजय भोसले,भाऊसाहेब सातदिवे,प्रशांत भारुड,जॉन कोळगे,अमर झिंझुरडे, गणेश भारुड आदी रिक्षा चालक उपस्तीत होते. पो.नि.न्याहळदे पुढे म्हणालेकी नियमात जर आपण असाल तर उत्तम ,परंतु नियम मोडल्यास कारवाईला सामोरे जावा लागेल, ,या प्रसंगी वाहतुकीचे नियमाबाबत माहिती देऊन वाहतुकीचे नियम पाळा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही,असे ही ते म्हणाले जर तुमची काही अडचण असेल तर आम्हाला कळवा आपण योग्य मार्ग काढू ,परंतु कोणत्याही साईभक्त,जनतेला आपला त्रास होणार नाही आपण ही काळजी घेतली पाहिजे,कोविड च्या काळात आपण स्वतःची काळजी घ्या,परिवाराची काळजी घ्या असे शेवटी त्यांनी सांगितले, उपस्थित चालकांनी आपल्या पासून  वाहतूक नियमाचे उल्लंघन होणार नाही असे सांगितले. या प्रसंगी वाहतूक पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News