सामाजिक स्वयंसेवी संघटनांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना हुतात्मा स्मारकात उन्नत चेतनाधारी भज्ञाकपूर्णा मानवंदना


सामाजिक स्वयंसेवी संघटनांच्या वतीने  सावित्रीबाई फुले यांना हुतात्मा स्मारकात उन्नत चेतनाधारी भज्ञाकपूर्णा मानवंदना

पंतप्रधानांनी सादर केलेल्या लाईट हाऊसची घरकुल वंचितांसाठी बांधणी करण्याची मागणी 

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - भारतीय जनसंसद, पीपल्स हेल्पलाइन व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे झालेल्या घरकुल वंचितांच्या बैठकित सावित्रीबाई फुले यांना उन्नत चेतनाधारी भज्ञाकपूर्णा अशी मानवंदना देण्यात आली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने सादर केलेल्या लाईट हाऊसची बांधणी करण्याची मागणी करण्यात आली.

प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल, फरिदा शेख, अंबिका जाधव, लतिका पाडळे, पोपट भोसले, सखूबाई बोरगे, शशीकला गायकवाड आदिंसह महिला उपस्थित होत्या. घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी निंबळक येथील पड जागेवर आत्मनिर्भर भूमीगुंठा आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी एक गुंठ्याचे 230 प्लॉट पाडण्यात आले आहे. प्रत्येकी एक गुंठा भूखंडावर घरकुल वंचितांची घरे बांधण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने मांडलेल्या व नव्याने उपलब्ध असलेल्या बांधकाम तंत्रज्ञानाचा फायदा नगरच्या घरकुल वंचितांना मिळावा. तसेच मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारे अनुदान सुद्धा मिळण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे एक गुंठा प्लॉट वर दोन घरकुले होऊ शकणार असल्यामुळे बांधकामाचा खर्च फार कमी येऊन मोठ्या संख्येने घरकुल वंचितांच्या घरांचा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 

 स्त्री शिक्षणाची चळवळ साकारत असताना सावित्रीबाई फुले व नगरचे नाते जोडले गेले आहे. त्यांनी नगरला येऊन मिशनरीच्या वतीने मुलींना दिल्या जाणार्‍या शिक्षणाची माहिती घेऊन, पुढी स्त्री शिक्षणाची चळवळ भारतभर पसरवली.  स्त्री शिक्षणाचा ध्यास घेऊन त्यांनी स्त्रीमुक्ती आंदोलन यशस्वी केले. त्यामुळे हा सन्मान त्यांना देण्यात आला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.पूर्वी उन्नतचेतनेद्वारे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदि समाजसुधारकांनी कार्य केले. मात्र सध्या देशात उन्नतचेतनेचा अभाव असल्याने गोर-गरीबांसाठी असलेल्या अनेक योजना मोडीत निघाल्या आहेत. घरकुल वंचितांचा प्रश्‍न देखील रेंगाळत पडला आहे. भ्रष्ट मार्गाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमुळे विकास खुंटला असून, ते फक्त बोलघेवडे ठरले आहे. महात्मा फुले यांच्या काळापासून त्रस्त असलेला शेतकरी भज्ञाकभ्रांत नेत्यांमुळे आजही आर्थिक आणि सामाजिक गुलामगिरीत जखडलेला असल्याचा आरोप अ‍ॅड. गवळी यांनी केला. तर समाजात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले अशा उन्नतचेतनावादी व्यक्तीमत्वांचे विचाराने बदल घडणार असल्याचे सांगितले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News