आई सेवाभावी संस्थेच्या वतीने ज्ञानजोती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दौंड येथे मोठ्या उत्साहात महिला शिक्षण दिन साजरा


आई सेवाभावी संस्थेच्या वतीने ज्ञानजोती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दौंड येथे मोठ्या उत्साहात महिला  शिक्षण दिन साजरा

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी 

3 जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दौंड पोलिस स्टेशनच्या कार्यक्षम पोलिस उपनिरीक्षक सौ अमृता काटे / जाधव केंद्रप्रमुख पंचायतीच्या सौ नंदा धावडे/सावंत  मुख्याध्यापिका पुजा जाधव  डॉ सोनल खरात तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या महिलांना मार्गदर्शन करताना आई सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा शुभांगीताई धायगुडे शिंगटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजही महाराष्ट्रातील महिला सुरक्षित नसल्याची खंत व्यक्त केली असून येणाऱ्या काळात महिला सक्षमीकरणासाठी राज्यभर काम करणार असल्याचे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जाहीर केले पो उपनिरीक्षक अमृता काटे यांनी महिलांना सांगितले धाडसी बनले पहिजे मुकबला करण्याची हिंमत दिसून येत नाही, नीलम धायगुडे, साक्षी उकांडे, डॉ सोनल खरात यांनी मनोगत व्यक्त केले आई सेवाभावी संस्थेच्या सचिव सौ सुनिता धायगुडे खजिनदार सौ सुषमा उकांडे यांनी आलेल्या महिलांचे स्वागत करुन कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरीत्या करुन दाखवल्या बद्दल त्यांचे सर्व महिलांनी कौतुक केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News