कुरकुंभ येथील अपघातातील आई पाठोपाठ मुलाचाही मृत्यू,परांडा गावावर शोककळा


कुरकुंभ येथील अपघातातील आई पाठोपाठ मुलाचाही मृत्यू,परांडा गावावर शोककळा

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

 पुणे सोलापूर हायवेवर कुरकुंभ गावच्या झालेल्या भीषण अपघातात महिला जागीच ठार झाली होती तर चालक गंभीर जखमी झाला होता, त्याचा आज मृत्यू झाला असून ते दोन्ही मायलेक असल्याची माहिती पो हवा श्रीरंग शिंदे यांनी दिली आहे.एक जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास केडगाव चौफुला येथून अमोल वसंत सोनवणे वय 37 आणि त्यांची आई पुष्पा वसंत सोनवणे वय 58 हे एम एच 25 4424 या दुचाकीवरून त्यांच्या गावी परांडा जिल्हा उस्मानाबाद येथे चालले होते, कुरकुंभ गावच्या हद्दीत आल्यावर पुण्याहून सोलापूर कडे भरधाव वेगात जाणाऱ्या पिकप ने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली,दुचाकीसह त्या दोघांना पिकपने फरफटत समोरील दुभाजकाला धडकवले,या भीषण अपघातात पुष्पा सोनवणे यांचा मृत्यू झाला तर अमोल हा गंभीर जखमी झाला होता, त्याचा ही मृत्यू झाला आहे,पिकप चालक पिकप सोडून पळून गेला आहे,पुष्पा सोनवणे या परांडा नगरपरिषदेच्या  माजी नगरसेविका होत्या,या अपघाताची फिर्याद त्यांचा मोठा मुलगा रविंद्र सोनवणे यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे,या दोघांच्या जाण्याने परांडा शहरावर शोककळा पसरली,पुढील तपास पो हवा श्रीरंग शिंदे करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News