चापडगाव विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न


चापडगाव विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण :

चापडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा मंदाकिनी खंडागळे विद्यालयाचे प्राचार्य.परशुराम नेहुल,उपमुख्याध्यापक गणपत शेलार पर्यवेक्षक कांतेश्वर ढोले या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी इ.९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी वकतृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. कु.ऋतुजा विखे, कु.विशाखा पाटेकर, कु.घोडके स्नेहल या सर्वांनी अंधारातून प्रकाशाकडे भारतीय महिलांची झालेली वाटचाल या विषयाची माहिती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती हे औचित्य समोर ठेवून सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक, धार्मिक,  शैक्षणिक कार्य हे दैदिप्यमान होते.त्या काळातील अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांचे थैमान असतानाच महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजात प्रबोधन करून समाजाचे आघात झेलून त्यांनी पुणे येथे १८४८ ला भिडे वाड्यात स्त्रीशिक्षणाची सुरुवात केली त्यावेळी शिकलेल्या मुलीचा पती देवा घरी जातो, तिला वैधव्य येते या अंधश्रद्धेवर फुले दाम्पत्यानी मात करून मुलींना शिक्षणाची दारे खुली करून दिली. 

यानंतर सौ.चिंतामण मॅडम यांनी भारतीय स्त्रिया आणि सावित्रीबाई फुले या विषयी अप्रतिम माहिती दिली. विद्यालयाचे प्राचार्य परशुराम नेहुल यांनी त्या काळातील बालविवाह, सतीची चाल, केशवपण, अंधश्रद्धा यावर मात करण्यासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीबा फुले यांनी बागेतील फुलांची जेवढी काळजी घेतली तेवढीच काळजी समाजरुपी बागेतील फुलांची काळजी घेतली.मुलींच्या उद्धारासाठी अप्रतिम कार्य म्हणजे मुलींची शाळा सुरू केली. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकच त्यांनी समाजापुढे मांडले. सावित्रीबाई फुले यांनी आपल्या शत्रूला शोधा तो शत्रू म्हणजे अज्ञान हे अज्ञान घालवण्यासाठी ज्ञानाची गरज असते असे अप्रतिम मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती मंदाकिनी खंडागळे यांनी समाजातील लोकांचे अज्ञान हेच आपल्या अधोगतीचे कारण आहे हेच अज्ञात घालवण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवन प्रवास सुरू ठेवून ज्ञान तेथे मान हे सूत्र त्यांनी अंगीकारले होते असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. यावेळी इ.९ वी ते १२ वीचे विद्यार्थी,शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्षीय निवड सौ.प्रतिमा उकिर्डे मॅडम, सूत्रसंचालन श्रीमती शितल दहिवाळकर यांनी तर आभार श्रीमती मनिषा इंगोले यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News