चालू वीज वाहिनीवरील ट्रान्सफार्मरची चोरी करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांकडून जेलबंद


चालू वीज वाहिनीवरील ट्रान्सफार्मरची चोरी करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांकडून जेलबंद

अहमदनगर :(प्रतिनिधी संजय सावंत) नगरमध्ये महावितरणच्या वीज वाहिनीवर विद्युत ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम करणार्‍या साईदीप बिडकॉन कंपनीतून काढून टाकण्यात आलेल्या एका कर्मचार्‍याने कंपनीला धडा शिकवण्यासाठी चालू वीज वाहिनीवरील ट्रान्सफार्मरचे चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी साईदीप बिडकॉन कंपनीच्यावतीने कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरातून ट्रान्सफार्मर चोरीस गेल्याची फिर्याद देण्यात आली होती. कंपनीत सुपरवायझर पदावरून काढून टाकलेला गोश भारत पोळ आणि कचरू भुसारी यांनी ट्रान्सफार्मर चोरल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला होता. कोतवाली पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास केला. यात चोरी गेलेला ट्रान्सफार्मर पिकअप नेवून तो सोनई परिसरात सोडून आरोपी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक राकेश मानगावंकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि विवेक पवार यांच्या पथकाने सोनईत जावून सदर मुद्देमाल ताब्यात घेला. याप्रकरणी कचरू मच्छिंद्र भुसारी (रा.आखदवाडी, शेवगाव) याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी दीड लाख रुपयांचा ट्रान्सफार्मर, तीन लाखांची पिकअप गाडी असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विवेक पवार, पोना रवींद्र टकले, विष्णू भागवत, नितीन शिंदे, शाहीद शेख, भारत इंगळे, सुमित गवळी, तान्हाजी पवार, प्रमोद लहारे, सोमनाथ राउत, सुशिल वाघेला, सुजय हिवाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News