ॲक्शन हीरो बनवायचे असेल तर पोलिसांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे : पोलिस अधीक्षक पाटील


ॲक्शन हीरो बनवायचे असेल तर पोलिसांच्या  पाठीशी सर्वांनी उभे रहावे : पोलिस अधीक्षक पाटील

अहमदनगर( प्रतिनिधी - संजय सावंत) चांगल्या कामासाठी नगरकरांचे नेहमीच पाठबळ राहिले आहे. ते यापुढेही राहील. पोलिसांना वास्तवातील ॲक्शन हीरो बनवायचे असेल तर त्याच्या पाठीशी सर्वांनी उभे राहणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले.

पोलिस रेझिंग डेनिमित्त पोलिस अधीक्षक पाटील यांचा स्नेहबंध फौंडेशनतर्फे स्नेहबंधचे अध्यक्ष उध्दव शिंदे यांनी त्यांचा फुलांचे रोपटे देऊन सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.

पोलिस अधीक्षक म्हणाले, नगरमध्ये आल्यानंतर मी जी चांगली कामे केली आहेत. त्या सर्वांसाठी नगरकरांनी पाठबळ दिले आहे. आजवर राबवलेल्या अभियानापैकी मुस्कान अभियानांतर्गत आपल्यापासून दुरावलेली लहान मुले परत पालकांच्या स्वाधीन करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले. यावेळी त्यांनी स्नेहबंधने आजवर केलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन शिंदे यांचे अभिनंदन केले.  शिंदे म्हणाले, पोलिस अधीक्षक पाटील यांच्या कामाची पध्दत पाहता आगामी काळात जिल्ह्यातील गुन्हेगारी निश्चितच आळा बसेल. यावेळी पोलिस कर्मचारी संजय बेरड, सचिन पेंडुरकर आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News