सावित्रीबाई फुले जयंती निमित्त पंचशील नगर येरवडा येथे कायदेविषयक व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न..


सावित्रीबाई फुले जयंती निमित्त पंचशील नगर येरवडा येथे कायदेविषयक व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न..

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

 सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन निमित्त सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान,येरवडा व युवकमित्र परिवार नंदूरबार तर्फे येरवडा येथील पंचशील नगर बौद्धविहारात कायदेविषयक कार्यशाळा उत्साहात पार पडली.यावेळी महिलांना व्यवसाय व कायदेविषयक मार्गदशन व समुपदेशन करण्यात आले.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा संस्थेच्या अध्यक्षा उज्वलाताई गायकवाड,प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधीसेवा कक्षाच्या ऍड.विद्या लोखंडे,कौटूंबिक समुपदेशक गीतांजलीताई रिठे,युवकमित्रचे प्रवीण महाजन,समाजीक कार्यकर्त्या अर्चना संकपाळ हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.ऍड.विद्याताई लोखंडे व गीतांजलीताई रिठे यांनी उपस्थित महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले तर प्रवीण महाजन यांनी व्यवसाय मार्गदर्शनपर चर्चा घडवून आणली.संस्थेच्या अध्यक्षा उज्वलाताई गायकवाड यांनी सावित्रीबाई फुलेंच्या कार्यास उजाळा देत सामाजिक कार्याची माहिती दिली.यावेळी उपस्थित सर्व महिलांना सावित्रीबाई फुलेंची पुस्तके वाटप करण्यात आली.आभार अर्चना संकपाळ यांनी मानले. युवकमित्र परिवार पुणे यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News