टाकळीमिया येथे लग्नसमारंभात जेवणा मधून विषबाधा


टाकळीमिया येथे लग्नसमारंभात जेवणा मधून विषबाधा

राहुरी फॅक्टरी महाराष्ट्रभुमी प्रतिनिधी

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे लग्नसमारंभात जेवणा मधून विषबाधा झाल्याने वऱ्हाडी मंडळी सह ग्रामस्थ व लहान बालकांना विषबाधा झाल्याने खळबळ

टाकळीमिया येथील काळे यांची मुलगी व कोल्हार येथील कडस्कर यांचा मुलगा यांचा शुभविवाह आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी टाकळीमिया राहुरी फॅक्टरी रोड येथे काळे यांच्या निवासस्थानी  संपन्न झाला लग्नसमारंभात दुग्धजन्य पदार्थ रबडी या पदार्थातून विषबाधा झाल्याने जवळ जवळ शंभर च्या आसपास ग्रामस्थ लहान बालके वऱ्हाडी मंडळी यांना विषबाधा झाली. पहिली पंगतीत  जेवण झाल्यानंतर जेवले यांना त्रास होऊ लागल्याने यामध्ये  सूर्यभान जुंदरे, बापूसाहेब जाधव, रामभाऊ तारडे या ग्रामस्थांना त्रास होऊ लागल्याने त्यांना सुरुवातीला गावातील डॉक्टर अमोल म्हसे व तेथून राहुरी येथील डॉक्टर कुसळकर हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आले. वऱ्हाडी मंडळी ग्रामस्थांसह लहान मुले,मुली यांना त्याचा त्रास होत असल्याने त्यांना गावातील खासगी दवाखाने डॉक्टर म्हसे, डॉक्टर सोनवणे,  तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळीमिया येथे नेण्यात आले व तेथील डॉक्टरांनी त्यांना  राहुरी येथील डॉक्टर कुसळकर बालरोग तज्ञ डॉक्टर म्हस्के,नेहे विवेकानंद नर्सिंग होम राहुरी फॅक्टरी यांच्याकडे हलवण्यात यामध्ये वयोवृद्ध व लहान बालके यांचा जास्त समावेश आहे.तातडीने108 अंबुलान्स तातडीने घटनास्थळी टाकळीमिया  गावात दाखल झाली व रुग्णांना लहान बालकांना वरील ठिकाणी उपचारासाठी दाखल केले व रुग्णांवर उपचार सुरू आहेत तसेच सामाजिक कार्यकर्त्ये दत्ता कवाने, प्रताप जाधव प्रताप निमसे,पत्रकार बाळासाहेब सगळगिळे, संदीप विधाटे, राजेंद्र जाधव, सुनील गोसावी, यांनी रुग्णांना दवाखान्यात नेण्याचे सहकार्य केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News