महाराष्ट्र सरकारने आजच्या शुभदिनी महिला शिक्षण दिन साजरा केला तसेच केंद्राने पण साजरा करावा- माधुरी चाकणकार


महाराष्ट्र सरकारने आजच्या शुभदिनी  महिला शिक्षण दिन साजरा केला तसेच केंद्राने पण साजरा करावा- माधुरी चाकणकार

पुणे पत्रकार रघुनाथ ढोक

पुणे-(वडगांव)- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 190 व्या जयंती निमित्त फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातील  थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या पुतळ्यास सामाजिक कार्यकर्त्या सौ.पल्लवी चाकणकर आणि भारतीय स्त्री शिक्षणाचे आध्यप्रनेत्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास सौ.माधुरी चाकणकर यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी भाजप खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष अतुल चाकणकर ,संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक, बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राच्या संस्थापिका आशा ढोक उपस्थित होते.

यावेळी माधुरी चाकणकर म्हणाल्या की ब्रिटिश राजवटीच्या काळात फुले दाम्पत्याचा सन्मान सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल  ब्रिटिशांनी त्या काळात केला आज  उशिरा का होईना महाराष्ट्र  सरकारने आजच्या शुभदिनी सावित्रीबाई चा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला त्या बद्दल सर्व महिलांचे वतीने महाविकास आघाडीचे  अभिनंदन करते तर पल्लवी चाकणकर म्हणाल्या की सरकारने आणखी एक चांगले पाऊल उचलून भारतातील पहिली शाळा चालू केली तो भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून तातडीने जाहीर करावा. भिडे वाडा  कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेऊन  भारतातील पहिली मुलीची शाळा स्मारक  म्हणून तातडीने तयार करून पुढील जयंती दिनी त्याचे उदघाटन करावे ही तमाम महिलांच्या वतीने मागणी केली.

अध्यक्ष रघुनाथ ढोक म्हणाले की आपल्या महाराष्ट्रात अनेक संत महापुरुष होऊन गेले त्या सर्वांनीच अंधश्रद्धा कर्मकांड या विरोधात जनजागृती केली आहे त्या मध्ये फुले दाम्पत्याचे महान कार्य होते त्याला अनुसरूनच या व पुढील पिढीला सावित्री जोती मालिके द्वारे सामाजिक व शैक्षणिक  कार्य किती कठीण प्रसंगात केले होते हे प्रत्यक्ष मालिकेचे माद्यमातून समजू उमजू लागले होते तेवढ्यात टी आर पी चे कारण सांगून मालिका बंद पाडली ही दुर्दैवी घटना घडली आहे. या कामी सरकारने योग्य लक्ष घालून ज्या प्रमाणे कंपन्यांना सामाजिक कार्य करण्यास सांगितले जाते त्याप्रमाणे सर्व टी व्ही चॅनेल ने देखील  मालिकाच्या माध्यमातून महापुरुषांचा खरा इतिहास  दाखविने बंधनकारक करावे यामुळे  आपल्या महाराष्ट्रातील  महान व्यक्तीचे कार्य येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरेल शिवाय अनेक वर्षे चालेल असे रेकॉर्ड ही तयार होईल . पुढे ढोक असेही म्हणाले की महात्मा फुले समग्र  वाड्मय गेली अनेक वर्षांपासून शासकीय ग्रंथालयात उपलब्ध नसून ते अल्प किंमतीत उपलब्ध करावे  आणि सर्व साहित्य इंग्रजी मध्ये देखील उपलब्ध केले तर राष्ट्रीय लेवल वर महापुरुषांचे कार्य सहज  पोहचेल तसेच इंग्रजी माध्यम शाळेतील मुलाना      इतिहास माहिती होईल तसेच सरकारने सर्व महापुरुषांचे फोटो एक सारखे एका आकारात छपाई करावी म्हणजे ते सर्व कार्यालयात ,घरात लोक योग्य पद्धतीने लावतील .त्याचप्रमाणे बरखास्त केलेल्या फुले शाहू आंबेडकर चरित्र,साधने व प्रकाशन कमिटीचे कामकाज  लवकर सुरू करावे असे देखील म्हंटले .कार्यक्रमाची सांगता सत्याचा अखंड सर्वांनी गाऊन केला तर आभार क्षितिज ढोक यांनी मानले तर मोलाचे सहकार्य आकाश ढोक यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News