स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांची आज सर्व क्षेत्रात प्रगती -आ. संग्राम जगताप


स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांची आज सर्व क्षेत्रात प्रगती -आ. संग्राम जगताप

राष्ट्रवादीच्या वतीने महिला शिक्षण दिन साजरा वैद्यकिय व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान  

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या व भारताच्या प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रेरणेने मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून, महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी करुन दिली. आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहे. सावित्रीबाईंनी महिलांना खर्या अर्थाने जगण्याची दिशा दिली. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला. त्यामुळेच आज महीला उच्च शिक्षण घेऊन सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती करत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. तसेच राज्य सरकारच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी केली जात असताना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैद्यकिय व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सुरेश बनसोडे,अमित खामकर,अंजली आव्हाड, संतोष ढाकणे, संजय सपकाळ, मळू गाडळकर, संभाजी पवार, दिपक खेडकर,भरत गारुडकर, साहेबान जहागीरदार, मतीन शेख, प्रा. प्रशांत म्हस्के, शहानवाज शेख, प्रकाश कराळे, खंडू काळे, निलेश इंगळे, गणेश बोरूडे आदी उपस्थित होते.प्रा. माणिक विधाते म्हणाले की, सावित्रीबाई फुलेंचे आदर्श समोर ठेऊन महिलांनी योगदान द्यावे. राज्य सरकारने सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षमयी योगदानाची स्मृती ठेवत महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णयाचे स्वागत असून, राष्ट्रवादीच्या वतीने कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकिय क्षेत्रात योगदान देणार्‍या व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात आला असल्याचे सांगितले. यावेळी आयुर्वेद महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये कार्य केलेल्या डॉ.ए.ए. देशमुख, डॉ.पी.एस. जगताप, डॉ.एम.व्ही. देशमुख, डॉ.पी.एस. नलगे, डॉ.व्ही.के. वाघे, डॉ.यु.एस. पाटील, डॉ.आर.व्ही. म्हसे, डॉ. ए.पी. पवार यांचा तसेच दामोदर विधाते (मास्तर) प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका श्रीम. शोभा गिते, सविता सोनवणे, शोभा गाडगे, लता म्हस्के, सारिका गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News