श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात महीला शिक्षण दिन उत्साहात साजरा !!


श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात महीला शिक्षण दिन उत्साहात साजरा !!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन करतांना मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर समवेत शिक्षकवृंद

 संजय भारतीकोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव_श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महीला शिक्षण दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.

  या प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे  मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.रवि पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन श्री.एस.डी.गोरे यांनी तर आभार श्री.उल्हारे बी.सी. यांनी मानले.

या प्रसंगी कु.गौरीलक्ष्मीकांत राठी इ.१०वी (अ )व सानिया फारुख सय्यद १०वी (अ )या विद्यार्थ्यांनींनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व व सावित्री बाई फुले या विषयावर आपले विचार व्यक्त केले.

   या कार्यक्रमाला  विदयालयाचे जेष्ठ शिक्षक तुपसैंदर डी.व्हि,लकारे आर.आर,शिरसाळे एस.एन,गोसावी के.एस,सौ.महानुभाव के.एच,बोरावके आर.आर,गायकवाड ए.जी,रायते यु.एस,वाडीले एस.एस,तुपकर आर.एस आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.    

       यावेळी  विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News