संजीवनी शुगर केनच्या वतीने उस वहातुक साधनांना रेडियम रिफ्लेक्टर फलकाचे वाटप !!


संजीवनी शुगर केनच्या वतीने उस  वहातुक साधनांना रेडियम रिफ्लेक्टर फलकाचे वाटप !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव - रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे  सहकारी साखर कारखान्याच्या अमृत संजीवनी शुगर केन यांच्या वतीने माजी मंत्री शंकरराव  कोल्हे व कारखान्याचे चेअरमन  यांच्या मार्गदर्शनाली  व युवा नेते विवेक  कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना  कार्यास्थळावर रेडिअम रिफ्लेक्टर फलकाचे वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी  कोपरगाव तालुका पोलिस  ठाण्याचे  पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, अमृत संजीवनी चेअरमन पराग संधान, एपीआय अजय बोरसे, पोलिस ऊपनिरीक्षक शरद नांगरे, अमृत केनचे मॅनेजर जी. बी .शिंदे, अमृत संजीवनी चे एमडी बापूसाहेब शिंदे, शिंगणापूरचे पोलिस पाटील व सरपंच तसेच अमृत संजीवनीचे कर्मचारी  उपस्थित होते. 

यावेळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव  म्हणाले की, व्यसन करून वाहन चालविताना  अपघातांची संख्या जास्त प्रमाणात असून अपघात टाळण्याकरिता काळजी घेणे गरजेचे आहे  व्यसनांमुळे वाहन चालविताना त्यांना भान राहात नसून वाहनांच्या नियमांची विसर पडतो त्यामुळे परिणाम स्वताहाचा जीव धोक्याचं  आणुन व यात विनाकारण चूक नसताना 

दुस-याच्या जिवाला धोका निर्माण करणे तर कधी त्यात मृत्यूदेखील होतो अपघात टाळण्याकरिता  वाहन चालविताना मोबाईलवर  बोलू नये तसेच वाहन चालवितांना व्यसन करू नये तसेच  वाहतुकीचे नियम पाळावेत अशी सूचना यावेळी त्यांनी केली. तर अमृताने संजीवनीचे चेअरमन पराग संधान म्हणाले कि, जे वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळणार नाहीत तसेच वाहनांचे मागे रेडियम रिफ्लेक्टर फलक लावणार नाही अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी अशी अपेक्षा संबंधित अधिकारी यांना व्यक्त केली. यावेळी पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी ,केन मॅनेजर जीबी शिंदे  आदींनी मनोगत व्यक्त केले. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या  ऊस वाहतूक करणाऱ्या  ट्रक ट्रॅक्टर टायर बैलगाडी ट्रॅक्टर जुगाड या ९६२ वाहनांना  कारखान्याच्या अमृत संजीवनी शुगरकेन च्या वतीने रेडियम रिफ्लेक्टर फलक देण्यात देण्याचा शुभारंभ केला असून आठ तारखेच्या आत सर्व वाहनांना वाटप करण्यात येणार आहे.रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रम जिल्ह्यात प्रथम सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने राबविण्याचे दिसून आले प्रास्ताविक व आभार केशवराव होन यांनी  मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News