समाजाला शिक्षणासाठी सरस्वती नाही तर सावित्री ची गरज-सविता लोंढे


समाजाला शिक्षणासाठी  सरस्वती नाही तर सावित्री ची गरज-सविता लोंढे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सावित्रीच्या लेकी ...

 संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

 कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील अंगणवाडी क्र.23 मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी उपस्थित महिला मान्यवरांनी सावित्रीबाईंना अभिवादन केले.

पहिल्या महीला आद्यशिक्षिका व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य प्रेरणादायी व क्रांतीकारी आहे. सावित्रीबाईंचा निस्सीम त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले असुन महिलांना शिक्षित व सज्ञान होण्यासाठी सरस्वती ची नाही तर सावित्री ची गरज आहे सावित्रीमाईंचे प्रगतशिल व शिक्षित समाज घडविण्याचे कार्य पुढे नेणे हिच खरी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सुरेगावच्या महिला ग्रामपंचायत सदस्या सविता लोंढे यांनी या प्रसंगी केले. सुरेगाव येथील अंगणवाडी सेविका आश्विनीताई वाघ यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे मुख्य साधन आहे.शिक्षणाखेरीज मनुष्याचा विकास साधणार नाही असे सांगितले.

तर प्रतिभाताई ठोके फुले दांम्पत्या बदल बोलताना म्हणाल्या की फुले दाम्पत्यांनी जुन्या,चालीरित्या व रुढी परंपरांना मोडून काढण्याचे काम केले.समतेचा ज्वालामुखी ह्रदयात ठेवून कायम समाजसुधारणेचे कार्य केले.आहे

  सावित्रीमाई यांचा जयंती दिवस स्त्री मुक्ती दिन व बालिका दिन म्हणून साजरा केल्या जातो.या दिनाचे औचीत्य साधून दोन कन्या जन्मावर समाधान मानून कुटूंब नियोजनाची शस्रक्रिया  करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला आणि कोरोनो महामारीच्या साथीमध्ये आपली सेवा देण्याचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना कोविड योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.

     या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका अश्विनी वाघ, संगीता क्षिरसागर, प्रतिभा ठोके, छाया खंडवे, विजया कदम, शुभांगी कानडे, नंदा मेहेरखांब, रंजना वाबळे, सुनंदा कोलते आणि पंचक्रोशीतील महिला,मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या.जाहिरात
Search
विडिओ
Recent News