महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला कोपरगाव काँग्रेस पक्षाचा आढावा !!


महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला कोपरगाव काँग्रेस पक्षाचा आढावा !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

2021 या वर्षात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी आ.सुधीरजी तांबे,आ.लहू कानडे,जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर,युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे,संगमनेर न.प च्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,अनुराधाताई नागवडे यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीची प्रत्येक तालुका नुसार आढावा बैठक शनिवार दि.२ जानेवारी रोजी संगमनेर येथे घेतली,कोपरगाव तालुक्यातील संघटनात्मक बांधणी,आगामी निवडणूक रणनीती,पदाधिकारी विस्तार,वर्षभरातील कार्यक्रम इतर अनेक बाबींवर या बैठकीत चर्चा झाली.कोपरगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग असून काँग्रेसच्या विचारांना जोडलेल्या लोकांपर्यंत प्रत्येक पदाधिकारी तसेच कार्यकर्ता पोहचला पाहिजे,येणाऱ्या वर्षात होणाऱ्या निवडणुका कोपरगाव तालुक्यात काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने लढवेल,महाविकास आघाडी सरकार संपूर्ण राज्यात यशस्वी घोडदौड करीत असून स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी यांनी काँग्रेस पक्षाला योग्य तो सन्मान दिल्यास महाविकास आघाडीचा विचार करून अन्यथा स्वबळावर लढण्याची संपूर्ण ताकद ठेवा अशा सूचना मंत्री.थोरात यांनी कोपरगाव तालुका व शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.कोपरगाव काँग्रेसची बैठक नुकतेच दिवंगत झालेले जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोकराव खांबेकर यांना श्रद्धांजली वाहून झाली,जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचा गत वर्षातील केलेल्या कामांचा कार्य अहवाल यावेळी मांडला,कोपरगाव काँग्रेसची संपूर्ण कार्यकारिणी जवळपास पूर्ण झाली असून आगामी काळात पक्षाची ताकद तसेच संघटन जोमाने वाढवण्यावर भर देऊन युवक व जेष्ठ नेत्यांचा मेळ घालून पक्ष मार्गक्रमण करेल असे तुषार पोटे म्हणाले,काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन शिंदे तसेच युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीजय चांदगुडे,युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सागर बारहाते यांनी ग्रामीण भागात पक्ष वाढीवर भर देऊ असे सांगितले.काँग्रेस शहराध्यक्ष सुनील साळुंके तसेच युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्षय आंग्रे,युवक शहर कार्याध्यक्ष गिरिष अकोलकर यांनी येत्या 8 महिन्यात होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष जोमाने वाढवू तसेच प्रत्येक प्रभागात जाऊन घोंगडी बैठकांचे आयोजन करण्याचा मानस मंत्री थोरात यांना सांगितला.महिला तालुकाध्यक्ष ऍड.शीतल देशमुख,महिला शहराध्यक्षा रेखाताई जगताप यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिला काँग्रेसची मजबूत फळी निर्माण करू असे सांगितले यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे,तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,शहराध्यक्ष सुनील साळुंके,तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय जाधव,शब्बीर शेख,सचिव ज्ञानेश्वर भगत,अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हा सचिव राजुभाई पठाण,अल्पसंख्याक शहराध्यक्ष अब्बासभाई सय्यद,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीजय चांदगुडे,कार्याध्यक्ष सागर बारहाते,युवक काँग्रेस शहराध्यक्ष अक्षय आंग्रे,युवक शहर कार्याध्यक्ष गिरिष अकोलकर,विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सचिव निरंजन कुडेकर,विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष जय कदम,विद्यार्थी शहराध्यक्ष आशपाक सय्यद,कार्याध्यक्ष ऋषी पगारे,महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा ऍड.शीतल देशमुख,महिला काँग्रेस शहराध्यक्षा रेखाताई जगताप,तालुका सचिव चंद्रहार जगताप,मंगेश देशमुख,दादा आवारे,शुभम जाधव तसेच कोपरगाव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोपरगाव काँग्रेसची संपूर्ण कार्यकारिणी जवळपास पूर्ण झाली असून आगामी काळात पक्षाची ताकद तसेच संघटन जोमाने वाढवण्यावर भर देऊन युवक व जेष्ठ नेत्यांचा मेळ घालून पक्ष मार्गक्रमण करेल असे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News