महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न!! समाजाच्या गरजा ओळखून काम करावे - श्रीकांत आंबेकर


महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न!! समाजाच्या गरजा ओळखून काम करावे - श्रीकांत आंबेकर

 नगर - (प्रतिनिधी संजय सावंत) कोरोनाच्या संकटानंतर रक्तदान ही महत्वाची गरज बनली आहे. रक्ता अभावी अनेक समस्या उद्भवत आहे, त्यामुळे अनेक पातळीव्यांवर रक्तदान चळवळीत पुन्हा नव्या जोमाने सुरु करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या रक्तदान शिबीराचे आयोजन करुन सामाजिक दायित्व जपले आहे. राष्ट्र पुरुषांनी समाजाच्या उन्नत्तीसाठी जे योगदान दिले आहे, जे विचार दिले आहेत, त्या विचारांवर आपण सर्वांनी चालले पाहिजे. समाजाच्या गरजा ओळखून त्यादृष्टीने आपण काम केल्यास एक चांगला समाज निर्माण होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन श्रीकांत आंबेकर यांनी केले.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्यावतीने माळीवाडा येथे रक्तदान शिबीर व दंत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ सुदर्शन गोरे ,श्रीकांत आंबेकर, भारत जाधव, अक्षय गाडळकर, विकी कानडे, कमलेश जंजाळे, ओंकार फुलसौंदर, ओंकार लेंडकर, गणपत चेडे, मंदार लोखंडे, अक्षय चेडे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी भारत जाधव म्हणाले, महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्यावतीने नेहमीच समाज हिताच्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. रक्तदानाची गरज ओळखून शिबीराचे आयोजन करुन गरजवंतांच्या रक्ताची गरज भागविण्याचा छोटासा प्रयत्न यानिमित्त केला आहे. सावित्रीबाई फुले यांचे त्याकाळातील सामाजिक खूपच संघर्षमय होते. अशा महान व्यक्तींचे स्मरण सामाजिक उपक्रमात ठेवण्याचा प्रयत्न यानिमित्त केला आहे.  कार्यक्रमास मंगल भुजबळ, स्वाती सुडके, विष्णूपंत म्हस्के, अनिल इवळे, चंद्रकांत ताठे, बजरंग भुतारे, रोहित व्यवहारे, मोहित गांधी, शुभम भापकर, सिंद्धांत जाधव, अजिंक्य म्याना,अशोक तुपे  आदि उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय गाडळकर यांनी केले तर आभार विकी कानडे यांनी मानले. यावेळी पोलिस कर्मचार्‍यांनीही रक्तदान करुन प्रोत्साहन दिले. रक्तसंकलनाचे कार्य अर्पण रक्तपेढीच्यावतीने केले तर डॉ. सुदर्शन गोरे यांनी रुग्णांची दंत तपासणी केली. या शिबीरात 51 रक्तपिशव्यांचे रक्तसंकलन झाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News