वक्तृत्व स्पर्धेतून सौ. सुशीलामाईंच्या स्मृती चिरंतन राहतील -आ. आशुतोष काळे


वक्तृत्व स्पर्धेतून सौ. सुशीलामाईंच्या स्मृती चिरंतन राहतील -आ. आशुतोष काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी. 

 मुलांप्रमाणे मुली देखील कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता त्यांनी देखील उच्च शिक्षण घ्यावे व आपले नाव कमविले पाहिजे अशी सौ.सुशीलामाई काळे यांची मनस्वी इच्छा होती. माईच्या आठवणीतून नेहमीच बालपण जागे होते, माईचे व्यक्तिमत्व तरुणांना आपल्या आईचे दर्शन घडवित व नेहमी सकारात्मक उर्जा देत असे. या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या कर्तुत्वाचा गौरव होऊन सौ. सुशीलामाईंच्या स्मृती नेहमीच चिरंतन राहतील अशा भावना रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केल्या.

एस.एस.जी.एम. महाविद्यालय कोपरगाव येथे स्व.सौ. सुशिलामाई काळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी बोलतांना आमदार आशुतोष काळे.

             स्व.सौ. सुशिलामाई काळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त एस.एस.जी.एम. महाविद्यालय कोपरगाव येथे सालाबाद प्रमाणे याहीवर्षी आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन आमदार आशुतोष काळे तसेच (व्ही.सी.द्वारे) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर देसाई प्रसिद्ध उद्योगपती सुनील जगताप (व्ही.सी.द्वारे) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

               ते पुढे म्हणाले की, जीवघेण्या कोरोनाच्या संकटात देखील भान ठेऊन वक्तृत्व स्पर्धेचा नावलौकिक जोपासत असल्याद्दल महविद्यालयाचे कौतुक केले. ज्याप्रमाणे कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी प्रमाने एस.एस.जी.एम. महाविद्यालयाला वैभव प्राप्त करून दिले ती परंपरा कायम ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

                यावेळी व्ही.सी.द्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले की, आपुलकीची उब मिळाली की, प्रेमाचा पाझर फुटतो व व्यक्तिमत्व खुलते त्यासाठी आई कळावी लागते. आईच्या कर्तृत्वाची आठवण सतत येणे हे संस्कृतीचे लक्षण असताना महाविद्यालयात सुशीलाबाई उर्फ माई यांच्या नावाने वक्तृत्व स्पर्धा आयोजित होणे हे द्रष्टेपणाचे लक्षण असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती सुनील जगताप होते. सदर कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य संदीप वर्पे, सुनील गंगुले परीक्षक डॉ. प्रकाश शेवाळे, डॉ. चंद्रकांत रुद्राक्षे, डॉ. निर्मला कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. आर. थोपटे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय स्पर्धा संयोजक डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला. या स्पर्धा यशस्वितेसाठी उपप्राचार्य प्रा. रमेश झरेकर,डॉ. विजय निकम, प्रा. ए. के. देशमुख, प्रा.डी. डी. सोनवणे आदींसह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. छाया शिंदे यांनी केले व आभार डॉ. सुरेश काळे यांनी मानले.


           

जाहिरात
Search
विडिओ
Recent News