महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या! केंद्राकडे शिफारस करण्याची डॉ अर्चना पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना  भारतरत्न द्या! केंद्राकडे शिफारस करण्याची डॉ अर्चना पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

महिला शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या निरीक्षक डॉ अर्चना पाटील यांनी मागणी केली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई या महिला शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी यावेळी पाटील यांनी केली.यावेळी डॉ अर्चना पाटील म्हणाल्या की महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या मुळे आज महिला, मुली अनेक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने यशप्राप्त केले आहे, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाईं मुळे अनेक मुली, शिक्षिका, डॉकटर, पायलट, वैज्ञानिक , इंजिनियर, सैनिक अशा अनेक क्षेत्रामध्ये आपले योगदान देत आहेत.

 सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हें तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत. या व्यतिरीक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हंटल्या जातं. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची घातले. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतांना सावित्रीबाईंना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले परंतु त्यांनी हार मानली नाही आणि धैर्य खचु न देता संपुर्ण आत्मविश्वासाने संघर्षाला सामोरे गेल्या आणि यश मिळवलेच.

सावित्रीबाईंनी 1 जानेवारी 1848 साली, शिक्षणाचे माहेर घर असे ज्याला आपण म्हणतो त्या पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मदतीने त्यांना सतत पुढे जाण्याकरता प्रेरणा मिळत होती, ते त्यांचे फक्त पती नव्हते तर एक चांगले गुरू व संरक्षक देखील होते. सावित्रीबाईंच्या कार्याचे ते सतत कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवित असत.

 मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले  यांना भारतरत्न देण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी अशी मागणी डॉ अर्चना पाटील यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News