समता पतसंस्थेचा घरपोहोच सोनेतारण व लॉकर सुविधेचा शुभारंभ !!


समता पतसंस्थेचा घरपोहोच सोनेतारण व लॉकर सुविधेचा शुभारंभ !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव- समता नागरी सहकारी पतसंस्थेने केवळ ठेव वाढीमध्ये उच्चांक केला नसून सेवा देण्यात देखील उच्चांक प्रस्थापित केला असल्याने देशातील बँकांनी पतसंस्थांचा आदर्श घ्यावा असे कामकाज समता पतसंस्थेचे आहे. तसेच आर्थिक प्रगतीचे पुढचे पाऊल ओळखून समताने पुढील वाटचाल सुरु केली असून पुढील ५ वर्षानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत महाराष्ट्रात अव्वल असेल आणि समताचे अनुकरण इतर सहकार चळवळीतील पतसंस्था करतील, यात नेटविन कंपनी महत्वपूर्ण साथ देत आहे.समता राबवीत असलेले सर्वच उपक्रम आणि योजना अभिनंदनीय व कौतुकास्पद असून या सर्व योजना आणि उपक्रम ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम करत आहे यामुळेच पुढच्या दृष्टीने समताची आर्थिक प्रगती होणार आहे’ असे गौरोद्गार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे विद्यमान संचालक श्री.सतीशजी मराठे यांनी काढले. 

या प्रसंगी बोलतांना नॅशनल फेडरेशन ऑफ बँक अॅड क्रेडीट सोसायटीज या देशातील बँक व पतसंस्था फेडरेशनचे संचालक व सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री श्री.उदय जोशी म्हणाले कि, समता पतसंस्थेचे चेअरमन .ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी आपल्या पतसंस्थेच्या वाढीबरोबरच राज्यातील पतसंस्थांची चळवळ बळकट करण्यासाठी देखील प्रयत्न केलेले आहेत.

महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने  सूर्या कॉम्प्लेक्स, बँक रोड कोपरगाव येथील घर पोहोच सोनेतारण व लॉकर सुविधाचा शुभारंभ तसेच क़्यु आर कोडच्या यु.पी.आय. सिस्टीमचा शुभारंभ आर.बी.आय.चे विद्यमान संचालक मा.सतीशजी मराठे व नॅशनल फेडरेशन ऑफ बँक अॅड क्रेडीट सोसायटीज या देशातील बँक व पतसंस्था फेडरेशनचे संचालक व सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री श्री.उदय जोशी यांचे शुभ हस्ते २ जानेवारी २०२१ रोजी  संपन्न झाला. उद्या ३ जानेवारी २०२१ पासून सूर्या कॉम्प्लेक्स, बँक रोड कोपरगाव येथील घर पोहोच सोनेतारण व लॉकर सुविधा ग्राहक व सभासदांसाठी सुरु होत आहे.

या प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना समता पतसंस्थेचे चेअरमन श्री.ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले कि,’समताचा प्रगतीचा प्रवास हा सभासदांचा आमच्यावर असलेल्या विश्वास आणि त्यांची घेत असलेली काळजी होय. कारण कि आम्ही ग्राहक, सभासदांसाठी विविध सामाजिक उपक्रम व योजनांमधून त्यांना फायदा व्हावा व त्यांना सर्व योजनांची माहिती व्हावी यासाठी सभासदांच्या दृष्टीने विविध विषयांच्या चित्रफिती तयार करून प्रसिद्धीच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत पोहचविन्याचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केले जात आहे.कोरोनातही जेष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या त्यामुळेच समता ही शहरापुरतीच मर्यादित नसून ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहचत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक श्री.संदीप कोयटे यांनी केले. प्रास्ताविकात ते म्हणाले कि, ‘समताने आज मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन सुविधांद्वारे सभासदांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच ३१ डिसेंबर २०२० पर्यंत समताचे ठेवी आणि कर्ज मिळून १ हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला असून आजची परिस्थिती लक्षात घेता सोनेतारण कर्जावर विशेष भर देत आहोत. 

या प्रसंगी रिझर्व्ह बँकेचे विद्यमान संचालक श्री.सतीश मराठे आणि नॅशनल फेडरेशन ऑफ बँक अॅड क्रेडीट सोसायटीज या देशातील बँक व पतसंस्था फेडरेशनचे संचालक व सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री श्री.उदय जोशी यांचा सत्कार समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केला. समता पतसंस्थेने आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने तयार केलेल्या सभासद हिताच्या चित्रफिती पाहून प्रमुख उद्घाटक व प्रमुख पाहुणे भावूक होत त्यांनी समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

उद्घाटनपर कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान संचालक श्री.सतीश मराठे, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री श्री.उदय जोशी हे प्रमुख उद्घाटक म्हणुन तर  महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन चे खजिनदार श्री. दादाराव तुपकर, नेटविन संचालक श्री.अरविंद महापात्रा, मार्केटिंग मॅनेजर मसऊद अत्तार आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर समता पतसंस्थेचे संचालक श्री. सचिन भट्टड, मुख्य कार्यालयातील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार श्री.संदीप कोयटे यांनी मानले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News